Breakingराजाभाऊ सरनोबत यांची बिरसा फायटर्स कोकण विभाग कार्याध्यक्ष पदी निवड


ठाणे : राजाभाऊ सरनोबत  यांची बिरसा फायटर्स संघटनेच्या कोकण विभाग  कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. बिरसा फायटर्सचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा  यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 22 जुलै रोजी ऑनलाईन सभा घेण्यात आली. 


या सभेत कोकण विभागातील पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून बिरसा फायटर्स चे संस्थापक अध्यक्ष सुशीलकुमार पावरा यांनी राजाभाऊ सरनोबत यांची कोकण विभाग  कार्याध्यक्ष पदी निवड केल्याचे घोषित केले. तत्पूर्वी राजाभाऊ सरनोबत यांनी बिरसा फायटर्स संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. 


ठाणे जिल्हाध्यक्ष सतीश जाधव यांनी सुद्ध राजाभाऊ सरनोबत यांना कोकण विभाग कार्यकारिणीत घ्या, असे सुचवले. राजाभाऊ सरनोबत हे आदिवासी संघर्ष समिती मुरबाड तालुका अध्यक्ष म्हणून काम करत होते.त्याचबरोबर आदिवासी एकता परिषदमध्येही काम करत होते. मुरबाड तालुक्यात सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणारे राजाभाऊ सरनोबत हे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. त्यांनी एस टी महामंडळात नोकरी केली आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग भाग त्यांच्या साठी अधिक परिचित आहे. त्यांची   समाजाबद्धल काम करण्याची तळमळ लक्षात घेऊन त्यांना कोकण विभाग कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.


यापूर्वी सुद्धा आपण आदिवासी समाजाच्या विविध महत्त्वाच्या समस्या सोडविण्यासाठी काम केले आहे व आता युवा मंडळी सोबत  आपण काम करणार असल्यामुळे अत्यंत आनंद होत आहे. सुशीलकुमार पावरा संस्थापक बिरसा फायटर्स यांच्या कार्यांने मी प्रभावित असून त्यांच्या सोबत मला काम करायला नक्कीच  आवडेल. असे यावेळी नवनियुक्त कोकण विभाग  कार्याध्यक्ष राजाभाऊ सरनोबत यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा