Breaking
Video : सराईत गुन्हेगार अखेर जेरबंद, पुणे ग्रामीण पथकाची कारवाईपुणे / रफिक शेख : मंचर येथे गळा आवळून खून करणारा व मुंबईतील सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या पुणे ग्रामीण पथकाकडून जेरबंद करण्यात आला.


मंचर पोलिस स्टेशन हद्दीत दिनांक 8 जुलै 2021 रोजी पासून ते दिनांक 12 जुलै 2021 रोजी रात्री 8.30 वा. चे दरम्यान मुळेवाडी रोड मंचर येथे थोरात यांचे खोलीमध्ये दीपक साळुंखे उर्फ फारुक याने कैलास सोमनाथ ठाकूर याचा कोणत्यातरी अज्ञात कारणावरून त्याच्या गळ्यास दोरीने गळफास देऊन खून केल्या होता.गुन्ह्यातील आरोपी दीपक साळुंखे उर्फ फारुख हा खून केल्यापासून फरार होता. आरोपीचे पूर्ण नाव व मुळगाव या बाबत काही एक माहिती उपलब्ध नसल्याने तसेच आरोपी दुहेरी नाव धारण करून राहत असल्याने सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेणे अवघड व किचकट झालेले होते. 


गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवून पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीणचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना योग्य त्या सुचना करून यांचे मागदर्शनाखाली तपास पथक नेमण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे तपास पथक नेमून, पथक हे मंचर व परिसरात आरोपीचा शोध व तपास सुरू केला.


आरोपी दिपक साळुंखे उर्फ फारुख हा गुन्हा केलेपासून फरारी आहे व तो लोणावळा परिसरात असून तो मुंबई बाजुकडे पळुन जाणेचे तयारीत आहे. अशी बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे आदेशाने तपास पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे यांचे टीमने लोणावळा शहरात सापळा रचला.


आरोपी हा फिरस्ता असल्याने पोलिसांना वेष बदलून तसेच कामगाराच्या वेशात आरोपीची माहिती काढली. लोणावळा शहरातील कामगार कट्टा एसटी स्टँड येथून संशयित इसम यास ताब्यात घेतले असता त्याचेकडे चौकशी केली असता त्याने त्याचे नाव दिपक विष्णू साळुंखे उर्फ फारुख उर्फ काळू वय. ४२ वर्ष. मूळ. रा. कांदिवली चारकोप हिंदुस्तान नाका. मालाड वेस्ट मुंबई. सध्या रा. मुळेवडी रोड, मंचर  ता. आंबेगाव जिल्हा. पुणे. असे सांगितले. 


त्यास ताब्यात घेऊन त्यांचेकडे चौकशी केली असता त्याने त्या बाबत उडवा उडवी ची उत्तरे दिली तरी आरोपी मजकूर यांना पुढील कार्यवाही कामी वैद्यकीय तपासणी करून मंचर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास मंचर पोलीस स्टेशन करत आहे. 


आरोपीवर मुंबई येथे चारकोप पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. १००/२००६ भा.दं.वि. क. ४५७, ३८०, ३चारकोप पो.स्टे गु.र.नं. १०१/२००६* भा.दं.वि. कलम ३७९ प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.


या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सहायक पोलिस निरीक्षक नेताजी गंधारे, पोलिस हवालदार दिपक साबळे, पो. हो. पासलकर, पो.हवा. तापकिर, पो. हवा. गायकवाड, पोलिस नाईक संदिप वारे, पोलिस शिपाई अक्षय नवले, पो. कॉ.  सुपेकर, पो. कॉ. जावळे, पोलिस मित्र प्रसाद पिंगळे यांचा सहभाग होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा