Breaking
जेष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांचे निधन !


मुंबई : बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते दिलीप कुमार यांचं आज वृद्धापकाळानं निधन झालं आहे. वयाच्या ९८ व्या वर्षी त्यांनी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून दिलीप कुमार यांची तब्येत बिघडलेली होती. ज्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. परंतू आज सकाळी साडेसात वाजता त्यांची प्राणज्योत मालवली, अशी माहिती हिंदुजा हॉस्पिटलच्या प्रशासनाने दिली आहे.


३० जुनपासून दिलीप कुमार यांच्यावर हिंदुजा रुग्णालयातील ICU मध्ये उपचार सुरु होते. त्यांच्या पत्नी सायरा बानू या काळात त्यांच्या सोबत राहून तब्येतीविषयीच्या सर्व अपडेट्स त्यांच्या चाहत्यांपर्यंत पोहचवत होत्या. दिलीप कुमार यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.

दिलीप कुमार यांनी 1940-70 अशी जवळपास तब्बल तीन दशकं त्यांनी आपल्या जबरदस्त अभिनयाच्या जोरावर गाजवली. 1944 मध्ये आलेल्या 'ज्वार भाटा' या चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनयास सुरुवात केली होती. मात्र हा चित्रपट अपयशी ठरला होता. त्यानंतर आलेला 'मिलन' हा त्यांचा चित्रपट सुपरहिट ठरला होता. आणि त्यानंतर त्यांनी कधीचं मागे वळून पहिलं नाही. त्यांना बॉलिवूडमधील 'ट्रॅजेडी किंग' म्हणून ओळखलं जायचे.

आज भारतीय सिनेसृष्टीतील अनेक नामांकित कलाकार त्यांनी आपला आदर्श मानतात. अनेक कलाकारांनी तर त्यांची नक्कल करुन बॉलिवूडमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. इतका लोकप्रिय असलेला हा अभिनेत्याने वयाच्या 98 व्या वर्षापर्यंत आजाराशी लढा दिला. वयोमानामुळं गेल्या काही काळात अनेकदा त्यांची तब्येत बिघडली होती. शिवाय दिलीप कुमार यांचे भाऊ असलम आणि एहसान खान यांचे गेल्या वर्षी करोनाच्या संक्रमणाने निधन झाले होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा