Breaking

शहादा : अल्पवयीन आदिवासी मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा करण्याची बिरसा फायटर्सची मागणी



शहादा : नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील मंदाणे गावात ता.९ जुलै २०२१ रोजी एका अल्पवयीन आदिवासी मुलीचा पैशाचे आमीष दाखवून विनयभंग करत जबरदस्तीने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला असल्याची संतापजनक घटना घडली आहे. 


पीडित मुलीचे वडील मजूरीचे पैसे मागण्यासाठी गावात गेले होते व आई धुणीभांडी करण्यासाठी गावात गेली असता पीडीत १० वर्षाची मुलगी लहान भावंडांना सांभाळण्यासाठी घरीच होती. त्यावेळी पैशाचे आमिष दाखवून संशयित आरोपी विश्वास रूपचंद पाटील रा.मंदाणे यांनी अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून जबरदस्तीने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. सदर घडलेला प्रकार पिडीत मुलीने आईला सांगितला. त्यावरून मुलीच्या वडीलांनी आरोपीविरोधात पोलीस ठाण्यात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


या घटनेचा बिरसा फायटर्स या संघटनेने निषेध करत आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी बिरसा फायटर्सचे शहादा तालुका अध्यक्ष संतोष वळवी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिपील वळसे पाटील तसेच शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा