Breaking


शेवगांव : मोबाईल टॉवर असून नेटवर्क नसल्यामुळे ऑनलाइन शिक्षणाचा बट्ट्याबोळ


विद्यार्थ्यांसमोर सुध्दा अडचणींचा डोंगर, याला जबाबदार कोण ?



शेवगांव / अविनाश देशमुख : शेवगांव शहरासह तालुक्यातील गावा गावात जी ओ सह बी.एस.एन.एल., आयडिया आणि इतर कंपन्यांचे चे टॉवर आहेत. पण रेंज मात्र एकालाही नाही. नेटवर्क शहरात आहेत आणि रेंज मात्र  दुसऱ्या गावात येत आहे. त्यामुळे मोबाईल असुनही शेवगांव शहरात नेटवर्क येत नाही व खेडे गावात नेटवर्क येत नसल्याने शहरवासियां बरोबरच  ऑनलाइन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कित्येक अडचणीला सामोरे जावे लागतंय. 

शेवगांव शहरासह तालुक्यातील लाईट गेल्यास फोन कॉल बंद पडतो. विद्यार्थ्यांचे ऑनलाईन क्लास बंद पडतात नेटवर्क गायब होते सर्व मोबाईल कंपन्यांनी याची गंभीर दखल घ्यावी  व नेटवर्क पुर्ववत करावे, अन्यथा तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशारा शेवगांव शहरातील नागरिकांतर्फे देण्यात आला आहे.

शेवगांव शहरात बी.एस.एन.एल. सह सुमारे लहान मोठे शंभर टॉवर आहेत. पण टॉवरच नेटवर्क फक्त लाईट वर आधारित आहे. वीज गेली की नेटवर्क जाते चालु कॉल ड्रॉप होतो. तसेच पाऊस झाला तर दोन किंवा तीन तास  बंद पडते. बँका पतसंस्था खासगी आस्थापने यांचे व्यवहार ठप्प होतात नेटवर्क त्वरित सुरळीत करावे, या मागणीकडे सर्व नामांकित मोबाईल नेटवर्क कंपन्यांनी व त्यांची शिखर संस्था ट्रायने लक्ष घालणे गरजेचे आहे. त्यामुळे नेटवर्कचा तिढा सुटेल. त्यामुळे या मागणीची टॉवर कंपन्यांनी दखल घेऊन टॉवर लवकरात लवकर दुरुस्त करावे करावं, अशी मागणी शेवगावकर करत आहेत. 

ऑनलाइन शिक्षण आता सरकारने शिक्षकांना ऑनलाइन क्लास घेण्यास सांगितलं. नेटवर्क अभावी विद्यार्थी शिक्षण घेतील कसे ? असा प्रश्न निर्माण झाला असून सरकारने या बाबत दखल घ्यावी, व नेटवर्क पुर्ववत करावे, अन्यथा तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशारा शेवगांवकर संघटने तर्फे  देण्यात आला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा