Breakingसोलापूर : माजी आमदार नरसय्या आडम यांना अटक


सोलापूर, दि. ५ जून : मराठा आक्रोश मोर्चास मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जाहीर व सक्रीय पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आज सर्व कार्यकर्ते नियोजित वेळेत मोर्चास जाण्यासाठी तयारी करत असताना ताब्यात घेतले.


सदर बझार पोलीस ठाण्याचे गोपनीय कक्षाचे पोलीस ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर व युसूफ मेजर आणि मोहन कोक्कुल यांना ताब्यात घेऊन सोरेगाव येथे दाखल केले. तर  जेलरोड ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिंगाडे यांनी माकप चे अनिल वासम यांना घरीच नजरकैदेत राहतील असे सांगितले नंतर गुन्हे शाखेचे पोलीस ताब्यात घेतले व नंतर सोरेगाव येथे नेऊन दाखल केले.

सदर घडलेल्या प्रकारचा आडम यांनी निषेध व्यक्त करत मराठा आक्रोश मोर्चास पाठिंबा देत मराठा आरक्षण मिळेपर्यंत आम्ही मराठा क्रांती मोर्चासोबत राहणार असल्याचे स्पष्ट केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा