Breaking
विशेष : आदिवासी भागातील रस्ते प्रश्न ऐरणीवर; रोजगार - मरण डोक्यावर, मोलमजुरी पाचवीला पुजलेली


लोकप्रतिनिधींंनी लक्ष घालण्याची मागणी 


मुथाळणे (जुन्नर) :  आदिवासी भागातील रस्ते प्रश्न ऐरणीवर आला आहे. रोजगार आणि मरण डोक्यावर घेऊन मोलमजुरी पाचवीला पुजलेली आहे. मुथाळणे येथील आपघाताने हे अनुत्तरित प्रश्न समोर येत आहेत. अशि दुदैवी घटना किती लोकांचा बळी घेणार, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. गेल्या सहा महिन्यातील ही तिसरी घटना असून जानेवारी महिन्यात एका आपघातात तीन जणांना दुर्दैवी मृत्यू ला सामोरे जावे लागले होते.

आदिवासी मजुर हे सातेवाडी वरून बनकर फाट्यावर मोलमजुरी साठी येत असताना रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे पिकप वरचा चालक ताबा सुटला आणि खोल दरीत कोसळली. त्यामध्ये सुमारे ७० आदिवासी मजुर होते. २५ मजुर जखमी झाले असून ५ मजुर गंभीर आहेत. पुढील उपचार साठी माऊली हॉस्पिटल आळेफाटा येते दाखल करण्यात आले आहेत.

आदिवासी बांधव हे रोजगाराच्या शोधात आहे . देशाला स्वातंत्र्य होवून देखील मरण आणि मानवतेला काळीमा फासणारी गुलामगिरी आजही आदिवासी भागात आहे. शेती साठी पाणी नाही त्यामुळे सातत्याने मोल मजुरी साठी (देसांत) शेती कामे करण्यासाठी २५० रुपये अल्प मजुरीने काम करावे लागते. पारनेर, जुन्नर, नारायणगाव, मंचर व वीटभट्टी वर लहान मुलाबाळणा घेवून जात असतात.

आदिवासी समाज हा काँगेस, व राष्ट्रवादी पक्षाचा पारंपरिक मतदार आहे. जुन्नर आणि पलीकडच्या अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात आज पर्यंत ४० वर्षे याच पक्ष आमदार. आता देखील याच पक्षाचे अतुल बेनके व किरण लहामटे, आमदार म्हणून नेतृत्व करत आहेत.  

राज्यात याच पक्षाची सत्ता असताना आमदार काय करत आहेत, हे प्रश्न आता गावागावांतील तरुण, युवक विचारु लागले आहे. सोशल मिडियाच्या माध्यमातून किमान आता गावागावांत घडणाऱ्या घटना समोर येत आहेत. लोक आपले प्रश्न मांडत आहेत. बोलत आहेत, व्यक्त होत आहेत.

गेल्या चाळीस वर्षामध्ये रस्ते, पिण्याचे पाणी, शेतीचे पाणी, रोजगार हे प्रश्न अनुत्तरित राहिलेले आहेत. दुष्काळी परिस्थिती पाहणी करताना फक्त फोटो शूट, वर्तमान पत्रात जाहिरात बाजी होत या पलिकडे अद्याप तरी पुढे काही केले नाही, असेही नागरिक बोलत आहेत.

पोटाचा चिमटा काढून पहाटे चार वाजता उठून घर काम करून सकाळी आठ वाजता बनकर फाट्यावर माणसं येतात. संध्याकाळी पुन्हा आठ वाजता घरी पोहचतात. जीवाचा आटापिटा, ही माणसं सहन तरी कुठ पर्यंत करणार, याला सिमा उरलेली नसल्याचंही माणसं बोलू लागली आहेत.

आदिवासी युवक परिवर्तन प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी बोलताना सांगितले की, "प्रशासकिय अधिकारी कागदी घोडे नाचवत आहे. आदिवासी विकास विभाग फक्त टिमकी वाजवायला केला आहे. त्यातून ठेकेदार,अधिकारी, प्रतिनिधी मलामाल झाले आहेत. मतांची गणिते जुळवायला थेट दिल्ली पासून गल्ली बोळात बरोबर फिल्डिग लावतील, गावापर्यंत आम्ही आदिवासी समाजाचे कसे कैवारी आहोत हे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न फक्त निवडणुकीत केला जातो. नंतर या लोकप्रतिनीधींना ओळखले का तुम्ही ?  सत्तेच्या खुर्ची साठी आदिवासी समाजाला देशो धडीला लावला आहे, असाही आरोप करण्यात आला आहे.

कोपरे ते फोफसंडी रस्ता, मुथाळणे ते येसनठाव रस्ता, मांडवे ते जांभूळशी - काठेवाडी - माळीवाडी रस्ता अजूनही प्रलंबित आहेत. हे कधी मार्गी लागणार असेही नागरिक बोलत आहेत.

पिकप मालकावर गुन्हा दाखल करुन प्रश्न सुटणार नाही. तर लोकांचा शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटला तर रोजगाराचा प्रश्न निश्चित सुटणार आहे. लोकांना रोजगारासाठी स्थलांतरित होण्याची गरज पडणार नाही. त्या दृष्टीने लोकप्रतिनिधी, प्रशासन यांनी पुढाकार घेऊन निर्माण होणाऱ्या प्रश्नांवर शाश्वत उपाय करण्याची गरज यानिमित्ताने पुढे आली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा