Breaking
सुरगाणा : लसींचा पुरवठा वाढवा, मंदाकिनी भोये यांची आरोग्य मंत्र्यांकडे मागणी


सुरगाणा / दौलत चौधरी : कोरोना प्रतिबंधक लसींचा पुरवठा वाढविण्याची मागणी माजी सभापती मंदाकिनी भोये यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली. भोये यांनी आज (दि.17) आरोग्य मंत्री टोपे यांना फोन करून त्यांना सुरगाणा तालुक्यात लसीचा पुरवठा वाढवण्याची विनंती केली. त्यावर त्यांनी याबाबत तात्काळ संबंधित विभागाला कळवतो, असे आश्वासन दिले असल्याचे भोये म्हणाल्या.


मंदाकिनी भोये म्हणाल्या, गेल्या 4 महिन्यात सुरगाणा तालुक्यातील 100 च्या आसपास गावांमध्ये जाऊन जवळपास 10 हजार लोकांशी प्रत्यक्ष व 60 हजाराच्या आसपास लोकांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क साधून लसीकरण जनजागृती केल्यानंतर आज माझ्या तालुक्यात मला अपेक्षित असलेले परिणाम दिसायला लागले आहेत. बऱ्याच गावातले ग्रामस्थ मला स्वतः होवुन फोन करत आहेत. मॅडम मला लस घ्यायची आहे, येथे केंद्रांवर लस शिल्लक नाही, तेथे जाऊ काय करू? 

सुरुवातीला तालुक्यात लसीकरणाचे प्रमाण खूप कमी होते. साहजिकच आपल्या तालुक्याकडून लसीचा कमी कोठा उचलला जात होता. आपल्या लसींचा कोठा इतर तालुक्यांना दिला जात होता. परंतु आत्ता आपल्या तालुक्यात लसीकरणाचे प्रमाण वाढल्यामुळे वाट्याला आलेला लसींचा कोटा कमी पडत आहे. तरी मागच्या काळात कमी घेतलेला लसींचा कोटा आत्ता आपल्याला मिळायला हवा तसेच 100% आदिवासी भागाचा खास बाब म्हणून विचार करायला हवा, अशी मागणी भोये यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा