Breaking




आदिवासी भागात कोरोनावरील उपचारासाठी ‘सुरगाणा पॅटर्न’ प्रभावी : पालकमंत्री छगन भुजबळ



सुरगाणा / दौलत चौधरी : पालकमंत्री छगन भुजबळ यांचे हस्ते सुरगाणा तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार तालुका आदिवासी भाग असून गुजरात सिमेलगत असल्याने कोरोनाविषयी असलेले गैरसमज व भीतीमुळे उपचारासाठी आदिवासी बांधव पुढे येत नव्हते. 


अशा वेळी आदिवासी बांधवांचा ज्या उपचार पध्दतीवर विश्वास व उपचार घेण्याची तयारी आहे, अशी आयुर्वेदीक उपचार पध्दती सुरगाण्यासारख्या आदिवासी भागात पोहचवून आदिवासी बांधवावर उपचार करण्यात आले. या माध्यमातून कोरोनामुक्तीचा ‘सुरगाणा पॅटर्न’ आदिवासी भागात प्रभावी ठरला आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. भुजबळ फॉर्म येथे ‘सुरगाणा पॅटर्न’ यशस्वीपणे राबविणाऱ्या सुरगाणा तालुक्यातील वैद्यकीय क्षैत्रातील मान्यवरांचा सत्कार जिल्हा परिषदेच्या वतीने पालकमंत्री छगन भुजबळ यांचे हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. 


यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आमदार नितीन पवार, पत्रकार राहूल रनाळकर, वैद्य विक्रांत जाधव, आरोग्य अधिकारी डॉ. रविंद्र चौधरी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणवीर व आदि मान्यवर उपस्थित होते.


कार्यक्रमानंतर ‘सुरगाणा पॅटर्न’ यशस्वी करणाऱ्या जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.रवींद्र चौधरी, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. मिलिंद चिद्दरवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.दिलीप रणवीर, डॉ. चैतन्य बैरागी, वैद्यकीय अधिकारी कमलाकर चौधरी प्रा आ केंद्र पळसन, डॉ. योगिता जोपळे ग्रा रु सुरगाणा, डॉ. राजेश चौधरी प्रा आ केंद्र उंबरठाण डॉ.सागर पाटील बुबळी, डॉ. विजय साठे मानखेड, डॉ.कल्पेश भोये बार्हे, डॉ.जयेंद्र थविल पांगरणे, डॉ.अनिल हिंडे सराड, डॉ.अक्षय पाटील काळमाणे, डॉ.मधुकर पवार माणी, श्री विजय देवरे, श्री.वसंत गावित कठिपडा यांचा सत्कार जिल्हा परिषदेच्यावतीने पालकमंत्री छगन भुजबळ यांचे हस्ते करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा