Breaking
Video : विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला मिळाले जीवदानओतूर / रफिक शेख : ओतूर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पांगरीतर्फे मढ गावच्या हद्दीत विहीरीत पडलेल्या कोल्ह्यास जाळीच्या साहाय्याने विहिरी बाहेर काढून जीवदान दिले.कोल्हा विहिरीत पडल्याची माहिती वनविभागाला समजली असता वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल रविंद्र गवांदे, वनरक्षक ज्ञानेश्वर पवार, शौकत मोमीन, अतुल वाघुले, नाना जाधव यांच्या पथकाने नायलॉन जाळीच्या साहाय्याने कोल्ह्यास विहिरीतून सुखरूप बाहेर काढून जीवदान दिले. विहिरीच्या बाहेर येताच कोल्ह्याने सुटकेचा श्वास सोडत धूम ठोकली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा