Breakingमाळीण फाट्यावरील रस्ता सततच्या पावसाने खचला


फुलवडे (ता.२२) : माळीण ता. आंबेगाव येथे सतत पडत असलेल्या पावसामुळे बोरघर ते आहुपे रस्त्यावरील माळीण फाटा येथील रस्ता खचला आहे. हा रस्ता नुकताच तयार केला होता. त्याच्या साइडपट्ट्या न भरल्याने रस्ता खचला असून याठिकाणी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्ती न केल्यास असाणे, माळीण, आमडे, डोण, तिरपाड, नाव्हेड, पिंपरगणे, आहुपे  या गावांशी संपर्क तुटण्याची शक्‍यता येथील ग्रामस्थांनी व्यक्त केली.बोरघर ते आहुपे या ३०किलोमीटरच्या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्यात आले परंतु रस्त्याच्या दोन्ही बाजूला मुरूम टाकून साइड पट्ट्या भरण्यात आल्या नाहीत. त्यामुळे रस्ता लहान असल्याने एकावेळी दोन वाहणे पास होऊ शकत नाहीत. त्यामुळे वाहने रस्त्याच्या खाली घेताना खड्डे पडत असल्याने व सतत पडत असलेल्या पावसाने रस्ता खचत चालला आहे. त्यामुळे अपूर्ण असलेले काम पूर्ण करण्यात यावे, अशी येथील ग्रामस्थांची मागणी आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा