Breaking
हरीत क्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त वृक्षारोपणसुरगाणा (दौलत चौधरी) : हरीत क्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त सुरगाणा शेतकरी उत्पादक कंपनी ठाणगाव, शेतकरी कृषी सेवा केंद्र बाऱ्हे, गुरूकृपा मेडिकल बाऱ्हे यांच्या संयुक्त विद्यमाने डांग सेवा मंडळ संचलित माध्यमिक विद्यालय बाऱ्हे व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोपाळपुर येथे केशर आंबा, तैवान पेरू, गोल्डन सिताफळ, लिंबू, काश्मीरी बोर इत्यादी प्रकारचे झाडे लावून कृषी दिन साजरा करण्यात आला.


कृषी क्षेत्रातील मोलाच्या योगदानाची आठवण म्हणून महाराष्ट्र सरकारने ०१ जुलैला कृषी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्रात हरीत क्रांती आणण्यामध्ये वसंतराव नाईक यांचा मोलाचा वाटा होता. कृषी विषयक समस्या हाताळून महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत कसा स्वयंपूर्ण होईल, याकडे वसंतराव नाईक यांनी लक्ष दिले होते. वसंतराव नाईक यांनी त्यावेळची मर्यादित साधने आणि प्रतिकूल परिस्थितीचा सामना करून राज्यात कृषीक्रांती घडवून आणली असे मत अहिरे यांनी व्यक्त केले. प्रदुषण मुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने वृक्षारोपण करून झाडांचे संवर्धन करण्याचे आवाहन जयप्रकाश महाले यांनी व्यक्त केले. 


यावेळी सुरगाणा शेतकरी उत्पादक कंपनी सचिव जयप्रकाश महाले, नामदेव पाडवी, शेतकरी कृषी सेवा केंद्राचे विलास जाधव, गुरूकृपा मेडिकल बाऱ्हे मनोज देशमुख, सुनिल धुम, मुख्याध्यापक पी.एस.अहिरे, डी.व्ही.जाधव, एस.टी.बागुल, व्ही.के.भोंडवे, पी.पी.बोडके, ए.व्ही.शेवाळे, एन.एच.भुसारे, एम.एल.गायकवाड, वाय.डी.राऊत, एन.बी.अहिरे, एस.सी.अलबाड, एस.व्ही.गोसावी, गोपाळपुर शाळेचे शिक्षक बागुल, बिरारी तसेच शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा