Breaking




मोठी बातमी : विधानसभेत तुफान राडा, १२ सदस्यांचे सदस्यत्व १ वर्षासाठी रद्द !


मुंबई : आज महाराष्ट्र विधानसभेचे दोन दिवसासाठी अधिवेशन सुरू आहे. या दरम्यान विधानसभेचे तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना धक्काबुक्की आणि अरेरावी केल्याचा आरोप करण्यात आले आहे.


या घटनेनंतर भास्कर जाधव यांनी आपले मत मांडले. त्यानंतर संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी निलंबनाचा ठराव मांडला. आणि हा ठराव बहुमताने मंजूरही झाला. भाजपाच्या १२ आमदारांचं सदस्यत्व एक वर्षासाठी रद्द करण्यात आलं.



संसदीय कमिटी मांडलेल्या ठराव पारित झाल्यानंतर सदस्यांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये डॉ. संजय कुटे, ऍड. आशिष शेलार, अभिमन्यू पवार, गिरीष महाजन, अतुल भातखळकर, ऍड. पराग अळवणी, हरिष पिंपळे, राम सातपुते, जयकुमार रावत, योगेश सागर, नारायण कुचे, किर्तीकुमार बागडीया यांचे सदस्यत्व एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे. तसेच निलंबनाच्या कालावधीत त्यांना मुंबई व नागपूर येथील विधानभवनाच्या सिमेत येण्यास बंदी घालण्यात आली.


सभागृहात नक्की काय घडले ?


राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज विधानसभेत ओबीसींचा इम्पिरीकल डेटा केंद्र सरकारकडून मिळावा म्हणून अधिवेशनात ठराव मांडला. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपची भूमिका मांडली. त्यानंतर भुजबळांनी बोलण्यास सुरुवात केली. यावेळी उज्ज्वला गॅससाठी डेटा वापरला जातो. मग ओबीसींच्या आरक्षणासाठी का दिला जात नाही ? असा सवाल भुजबळ यांनी केला. त्यावर फडणवीसांनी हरकतीचा मुद्दा मांडला. त्यावेळी तालिका अध्यक्षांनी फडणवीसांचा हरकतीचा मुद्दा स्वीकारला नाही. अध्यक्षांनी भुजबळांना बोलण्यास सांगितलं. त्यामुळे भाजपचे आमदार आक्रमक झाले. भाजपच्या आक्रमक आमदारांनी अध्यक्षांच्या समोरी हौदात येऊन जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घातला. त्यानंतर एका आमदाराने अध्यक्षांचा माईक ओढला. या गदारोळात धक्काबुक्की झाली. यावेळी भाजपच्या आमदारांनी तालिका अध्यक्षांना शिवीगाळही केल्याचा आरोप करण्यात येत आहे.


...हा तर लोकशाहीचा खून - देवेंद्र फडणवीस 


यावर बोलताना विरोधी पक्षाने सत्ताधारी पक्षाच्या विरोधात घोषणाबाजी करत कामकाजावर बहिष्कार टाकले. यावेळी बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस म्हणाले, "हा लोकशाहीचा खून करण्यात आला आहे. आम्ही सरकारवर हल्ला करत असल्यामुळे आमची संख्या कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मोगलाई पध्दतीने कामकाज सुरु आहे. आम्ही कामकाजावर बहिष्कार टाकत आहे".

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा