Breaking


उत्तराखंडचे मुख्यमंत्री तिरथ सिंह रावत यांनी दिला आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामाउत्तराखंड : उत्तराखंडचे मुख्यमंत्री तिरथ सिंह रावत यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात भूकंप झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण होणार यावर उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. 


तिरथ सिंह रावत यांनी दिल्लीतील गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतल्यानंतर ४८ तासांमध्ये राज्यपाल बेबी रानी मोर्या यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. रावत यांनी जेमतेम चार महिने मुख्यमंत्री पदाचा कार्यभार सांभाळला होता.


दरम्यान, पक्षाचे उत्तराखंड अध्यक्ष मदन कौशिक यांच्या अध्यक्षतेखाली आज दुपारी बैठक पार पडणार आहे. या बैठकीत एखाद्या आमदारालाच मुख्यमंत्री पद दिले जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.


या राज्याच्या स्थापनेच्या २१ वर्षांत आठ मुख्यमंत्री झाले. मात्र, एन. डी. तिवारी वगळता एकाही मुख्यमंत्र्याला कार्यकाळ पूर्ण करता आलेला नाही. तसेच रावत यांनाही चार महिन्यातच राजीनामा द्यावा लागला आहे. तिरथ सिंह रावत हे आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सातत्याने चर्चेत राहिले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा