BreakingVideo : नागपूरात प्राध्यापक भरतीसाठी नवप्राध्यापक संघटनेचे बेमुदत साखळी उपोषण


नागपूर : राज्यातील प्राध्यापक पद भरती सुरु व्हावी या मागणीसाठी नागपूर येथील उच्च व तंत्रशिक्षण सहसंचालकांच्या कार्यालयासमोर महाराष्ट्र नवप्राध्यापक संघटनेच्या वतीने बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे. आंदोलनाचा आज चौथा दिवस असून सहाय्यक प्राध्यापक पदभरतीवरिल बंदी तात्काळ उठवावी व विनाअट १०० % प्राध्यापक पदभरती सुरु करा, १ ऑक्टोबर २०१७ च्या आकृतीबंधाला अंतिम मंजुरी देवून आज पर्यंतची सर्व रिक्त पदे भरा, सी.एच.बी. ला पर्यायी व्यवस्था म्हणून केंद्रिय विद्यापीठाच्या धर्तीवर प्रतिदिवस १५०० रूपये मानधन देऊन प्राध्यापकांची नेमुणक वर्षातील ११ महिन्यांसाठी करण्यात यावी, तासिका तत्त्वावरील कामाचा अनुभव कायमस्वरुपी सेवेत समाविष्ट झाल्यानंतर ग्राह्य धरण्यात यावे, राज्यातील सर्व विनाअनुदानीत महाविद्यालयांना त्वरीत अनुदान देण्यात यावे, आदी मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे.

या आंदोलनात डॉ. महेश जोगी, डॉ. प्रगटसिंग बावरा, प्रा. प्रमोद कानेकर डॉ. प्रशांत इंगळे, प्रा. आस्तिक गोवारीकर, डॉ. रायन महाजन, डॉ. बाबुदास दमाहे, डॉ. नामा सेलोकर, प्रा. अनिल बोंद्रे, प्रा. संदीप बोयार, प्रा. दिपक महोतो, प्रा. अजय पोटभरे, प्रा. सचीन यरपुडे, डॉ. राकेश कोरेकर, प्रा. राकेश मेश्राम आदी प्राध्यापक सहभागी आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा