Breaking
20 जुलै रोजी घरफाळा घोटाळ्याची माहिती जनतेपुढे सादर करू; प्रशासक कादंबरी बलकवडेकोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समिती समोर अधिकाऱ्यांची झाडा-झडती


कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेत गाजत असलेला घरफळा घोटाळ्यासंदर्भात 22 जून  2020 पासून घरफाळा घोटाळ्याची निवृत्त न्यायाधीश यामार्फत चौकशी करावी, घर फळा बुडवणारे मिळकत धारकांनी आणि घोटाळा करणारे अधिकारी यांच्यावर कारवाई करून चौकशी अहवाल जनतेसमोर जाहीर करावा अशी मागणी केली होती यावर आयुक्ताने दोन महिन्यात चौकशी करू असे सांगितले पण आज अखेर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.


याबाबत कृती समितीने गेली वर्षभर निदर्शने आंदोलने निवेदने देत आहे पण चौकशी चालू आहे या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही म्हणून कृती समितीने 9 जुलै 2021 रोजी जलसमाधी आंदोलन जाहीर केले होते त्यावर प्रशासकांनी कृती समितीला आंदोलन स्थगित करून चर्चेस बोलवले होते. 


त्याप्रमाणे आज बैठक झाली. या बैठकीस प्रशासक कादंबरी बलकवडे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई सहाय्यक आयुक्त विनायक औंधकर साहाय्यक निर्धारक विजय वणकुदै तसेच बैठकीस कृती समितीच्या वतीने अशोक पवार, रमेश मोरे, भाऊ घोडके, चंद्रकांत पाटील, महेश जाधव, विनोद डूणुंग हे उपस्थित होते.


त्यामध्ये यासंदर्भात कृती समितीला वेळोवेळी महापालिकेने कृती समितीला काय आश्वासने लेखी दिली याची कोणतीच माहिती दिलेली नव्हती या संदर्भात सर्वच माहिती पासून प्रशासकांना अनभिज्ञ ठेवले होते. त्यामुळे प्रशासकांनी करनिर्धारक औंधकर व घरफाळा विभागाची संतप्त झाडाझडती घेतली. इतकेच नाही तर कृती समितीने मागणी करून ही अँकर यांनी प्रशासकांची भेट का घडवून आणली नाही असा प्रशासकांनी जाब विचारला कृती समितीने मागणी केलेल्या भोगवटा प्रमाणें बिलाचे वितरण का केले नाही, अशा अनेक प्रश्न चा भडीमार केला.


कृती समितीच्या अशोक पवार रमेश मोरे यांनी प्रशासकांना सांगितले की आपण प्रशासकीय कामकाजात वेळ देत नाही. नागरिकांना भेटत नाही अशी आमची व जनतेची भावना निर्माण झाली आहे. खालचे अधिकारी कर्मचारी तुमच्यापर्यंत बऱ्याच गोष्टी पाठवत नाहीत. त्यामुळे जनते तुमच्याविषयी रोष निर्माण होण्याची शक्यता आहे.यावर आयुक्त म्हणाल्या चुकीचा समाज आहे जोपर्यंत आँफिस मध्ये विजिटर आहेत तोपर्यंत मी त्यांची भेट घेते. कार्यालय सोडून जात नाही तुम्ही तुमचे प्रश्न घेऊन डायरेक्ट मला भेटायला आणि कृती समिती व माझी भेट का घडवली नाही, असा जाब औधंकर याना विचारल.


शेवटी प्रशासकांनी समितीला सांगितले की तुम्ही थांबा या विभागाचे त्वरित आँडिट करून 20 तारखे पूर्वी तुमच्या चर्चा करून 20 तारखेला याबाबत जाहीर खुलासा करतो.


कृती समितीने इतकेच सांगितले की महापालिके घरफाळा घोटाळा झाला आहे की नाही हे जाहीर करा. झाला असेल तर घरफळा बुडवणारे करदाते आणि घोटाळा करणारे अधिकारी कर्मचारी यांच्याकडून घोटाळ्याची रक्कम वसूल करून सर्व सामान्य जनतेला न्याय द्या. यावर प्रशासन म्हणाल्या तुम्हावर आंदोलन करावयाची वेळ यापुढे घरफाळा घोटाळा प्रश्नावर ती येणार नाही एवढेच मी तुम्हाला आत्ता आश्वासित करतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा