Breaking
शालिनी स्टुडिओचा अंत होत असताना हेरिटेज कमिटी गप्प का होती..? अध्यक्षांनी खुलासा करण्याची मागणी
कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीची मागणी


कोल्हापूर : जागतिक चित्रपट सृष्टीत सिंहाचा वाटा असणाऱ्या कोल्हापुरातील हेरिटेज वास्तूपैकी नावाजलेल्या अश्या शालिनी स्टुडिओचे बांधकाम व्यावसायिकांकडून अस्तित्व संपवून अंत होत असताना ज्या कारणासाठी म्हणजेच ऐतिहासिक वास्तू वारसा स्थळांच्या संवर्धन आणि जपवणूकीसाठी शासनाने नेमलेल्या कोल्हापूर हेरिटेज समितीने हा स्टुडिओ वाचविण्यासाठी आपली नैतिक जबाबदारी म्हणून प्रत्यक्षात काय प्रयत्न केले याचा जाहीर खुलासा करावा अशी मागणी आम्ही कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितिने केली आहे.


समितीने म्हटले आहे की, सन २०१९ सालाच्या संरक्षित वास्तूच्या म्हणजेच हेरिटेज यादीत असणारा हा ऐतिहासिक शालिनी स्टुडिओ अचानक या यादीतून गायब कसा झाला याचे गौडबंगाल काय आहे ? म्हणजे कोल्हापूरच्या वारसा स्थळातील शताब्दी वर्ष पूर्णत्वाकडे असणारा हा ऐतहासिक स्टुडिओ त्याचे अस्तित्व संपवून बिल्डर लॉबी च्या ताब्यात जाण्यास या अस्तित्वात असणाऱ्या कोल्हापूरच्या हेरिटेज समितीचे योगदान आहे की काय अशी आम्हा कोल्हापूरकरांना शंका येत आहे. एरवी कोल्हापूरच्या विकास कामात पुरातन वस्तूंच्या सर्वधन विकासासाठी शासनाकडून आलेल्या निधी वापरून विकासकामे होत असतील तर कागदी घोडे नाचवून खोट्या निनावी तक्रारी दाखल करून विकास कामात खोडा घालणारी हेरिटेज कमिटी कोल्हापूरच्या दृष्टीने बिनकामाची आहे. अश्या बिनकामी हेरिटेज समितीने जनतेपुढे शालिनी स्टुडिओ संदर्भात जाहीर खुलासा करावा, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा शहर नागरी कृती समितीचे अशोक पोवार, रमेश मोरे, चंद्रकांत पाटील, अजित सासणे, चंद्रकांत सुर्यवंशी, विनोद ढूनुंग, लहुजी शिंदे, राजेश वरक, शंकर शेळके, पंपू सुर्वे, प्रमोद पुंगावकर यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा