Breakingयेवला : किसान सभा, माकपचा प्रांताधिकारी कार्यालयावर धडक मोर्चायेवला (नाशिक) : आज दिनांक ५ जुलै रोजी नाशिक जिल्हा किसान सभा व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने माजी आमदार जे. पी. गावित यांच्या नेतृत्वाखाली येवला येथील प्रांत कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला होता. 


मोर्चा मध्ये नांदगाव व येवला तालुक्यातील महिला पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या तालुक्यातील हजारो आदिवासी बांधवांना वन जमीनीचे प्रमाणपत्र व त्या प्रमाणपत्राच्या साहाय्याने ७/१२ सुध्दा मिळाले आहेत, असे असतांना नांदगाव, येवला येथील वनपरिक्षेत्र अधिकारी हे विनाकारण आदिवासी बांधवांना त्रास देऊन त्यांच्या जमीनीतून त्यांना हुसकवण्याचे तसेच उभ्या शेत पिकांचे नुकसान करण्याचे काम करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.यावेळी कॉ. धर्मराज शिंदे, इंद्रजीत गावीत, उत्तम कडु, नामदेव राठोड, हनुमंत गुंजाळ, सचिन अलगट, विजय दराडे, संगा चव्हाण, प्रकाश कापसे, शांताराम दळवी, उखा माळी, एस. पी. रठोड, पांडुरंग भोये आदीसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा