Breaking
Video : शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून खेड घाट बायपासचे उद्घाटन, पहा खा. अमोल कोल्हे काय म्हणाले !पुणे : शिवसेनेच्या माजी खासदार, आमदारांनी काल पुणे - नाशिक महामार्गावरील नारायणगाव बायपास खेड घाट बायपासचे उद्घाटन केल्यानंतर आज पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील खेड घाट बायपास रस्त्याचे उद्घाटन व लोकार्पण आमदार दिलीप मोहिते पाटील, खासदार अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.


VIDEO : श्रेयवादावर कोल्हेंनी केली आढळराव पाटीलांवर टीका
खेड घाटाच्या पायथ्याशी झालेल्या या लोकार्पण सोहळ्याला स्थानिक ग्रामस्थ व प्रकल्पबाधित शेतकऱ्यांची लक्षणीय उपस्थिती होती. या कामाचे खरे श्रेय हे प्रकल्पबाधित शेतकऱ्यांचे आहे. मी फक्त कर्तव्य म्हणून हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी व आलेल्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यामुळे खेडघाटाचे लोकार्पण या शेतकऱ्यांच्या हस्ते करण्याचा निर्णय आम्ही घेतला होता, असे. खा. अमोल कोल्हे म्हणाले.


त्यानुसार दत्तात्रय कोरडे, देवराम थिगळे, दशरथ थिगळे, तुकाईवाडीच्या सरपंच कुसुम भांबुरे यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडला.या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर, सभापती विनायक घुमटकर, महिला तालुकाध्यक्ष संध्या जाधव, युवती अध्यक्ष आशा तांबे, कांचन ढमाले, युवक अध्यक्ष कैलास लिंभोरे, युवक जिल्हाध्यक्ष सोमनाथ दौंडकर, विजय डोळस, दिलीप मेदगे, अरुण चांभारे, बाबा राक्षे, विलास कातोरे, बाळशेठ ठाकूर, रामदास ठाकूर, दादा इंगवले, सुभाष होले, नवनाथ होले, अरुण थिगळे, धैर्यशील पानसरे, मनीषा सांडभोर व अन्य पदाधिकारी, तुकाईवाडी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा