Breaking


नाशिक विभाग कामगार उपायुक्त पदी विकास माळी यांची नियुक्ती झाल्याबद्दल आयटक वतीने सत्कार !


नाशिक
 : नाशिक विभाग च्या कामगार उपायुक्त पदी विकास माळी यांची नियुक्ती झाल्याबद्दल आयटक च्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार कार्यालयात आयटक राज्य सचिव कॉम्रेड राजू देसले, नाशिक आयटक जिल्हा उपाद्यक्ष कॉम्रेड सुनीता कुलकर्णी, संघटक अविनाश दोंदे यांनी केला. 


विकास माळी हे 2013 ते 2016 काळात नाशिक येथे सहायक कामगार आयुक्त पदाची धुरा सांभाळली असल्यामुळे त्यांना नाशिक विभागातील कामगार उद्योजक प्रश्न ची जाणीव आहे. या प्रसंगी माळी यांनी नाशिक जिल्ह्यातील घरकामगार (मोलकरीण), बांधकाम कामगार च्या योजना अंमलबजावणी जलद गतीने करण्याचा मनोदय व्यक्त केला. औद्योगिक क्षेत्रात कामगार प्रश्न व उद्योजक प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी प्रयत्न राहणार असल्याचेही ते म्हणाले.

कॉम्रेड राजू देसले म्हणाले, कामगार उपायुक्त कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी रिक्त पदे भरण्यासाठी पाठपुरावा करणे आवश्यक आहे. घरकामगार, बांधकाम कामगार साठी स्वतंत्र अधिकारी कर्मचारी कार्यलय आवश्यक आहे. या साठी आयटक सुध्दा पाठपुरावा करेल . आपण पुढाकार घ्यावा असे आवाहन या प्रसंगी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा