Breakingमंचर : दहशत पसरविणारा आरोपी अटकेत


जुन्नर / आनंद कांबळे : मंचर व खेड भागात फायरिंग करून दहशत पसरवू पाहणाऱ्या खुनातील फरार कुख्यात गुंड स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले.

     

   
मंचर पोस्टे गु.र.नं ४५९/२०२१ भादवि कलम ३०२,१२०(ब), ३४ सह शस्त्र अधिनियम १५५९ चे कलम ३(२५)(२७) असा दिनांक २/०८/२०२१ रोजी दाखल झाला होता. तसेच खेड पोस्टे गु.र.नं ३८५ / २०२१ भादवि कलम  ३०२, १४३, १४७, १४८, १४९, २०१ नुसार दाखल होता. सदरचे दोन्ही गुन्हे गंभीर स्वरूपाचे असल्याने गुन्हे उघडकिस आणून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक यांनी गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या.

त्यानुसार सदर गुन्ह्यांचा खेड मंचर परिसरात तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील फरार आरोपी तसेच खेड मंचर भागात दहशत माजवणाऱ्या कुख्यात गुंड पवन सुधीर थोरात वय २२ वर्ष रा. जुना चांदोडी रोड, ता. आंबेगाव, जि.पुणे हा मंचर परिसरात येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली. त्यानुसार मंचर परिसरात सदर आरोपीचा शोध घेत असताना मंचर बस स्टँड येथे एक इसम संशयितरित्या फिरताना आढळला त्यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याचे पूर्ण नाव पवन सुधीर थोरात असे सांगितले. यापूर्वी त्याच्यावर विविध पोलीस स्टेशन येथे एकूण ८ गुन्हे दाखल आहेत.

सदर आरोपीची वैदकीय तपासणी करून पुढील तपासा करीता मंचर पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिला आहे.
  
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, उपविभागीय पोलीस अधीकारी लंभाते यांचे मागदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सपोनि. नेताजी गंधारे, पो.हवा. दिपक साबळे, पो.हवा. हनुमंत पासलकर, पो.हवा. विक्रम तापकिर, पो.हवा. राजू मोमीन, पो.ना. संदिप वारे, पो.कॉ. अक्षय नवले, पो.कॉ. दगडू वीरकर, पोलीस मित्र प्रसाद पिंगळे यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा