Breaking
हवाईदलाचे मिग 21 कोसळले, वैमानिक जखमीबाडमेर : हवाई दलाचे मिग 21 लढाऊ विमान राजस्थानच्या बाडमेर भागात कोसळले आहे. हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात बुधवारी संध्याकाळी 5.30 वाजता भुरटिया गावात झाला. लढाऊ विमानाने उड्डाण केल्यानंतर, तांत्रिक बिघाड झाला आणि विमान एका झोपडीवर कोसळले, ज्यामुळे आग लागली. मात्र वेळीच पायलट विमानातून बाहेर पडल्याने तो सुदैवाने सुखरुप आहे. विमान दुर्घटनेबाबत हवाई दलाने चौकशीचे आदेश दिले आहेत.


निधनवार्ताआंतरराष्ट्रीय ख्यातीच्या समाज शास्त्रज्ञ डॉ. गेल ऑम्व्हेट यांचे निधन !


दुर्घटनाग्रस्त मिग -21 लढाऊ विमानाचा पायलट अपघातस्थळापासून एक किलोमीटर दूर नवजी का पान गावाजवळ सापडला. स्थानिक लोकांनी त्याची काळजी घेतली आणि प्रशासनाला कळवले. यानंतर पोलिस आणि प्रशासनाने घटनास्थळ सील केले आहे. एअरफोर्स टीमही घटनास्थळी रवाना झाली आहे.एकेकाळी मिग -21 ला भारतीय हवाई दलाचा कणा म्हटले जात असे, पण आता ही विमाने अप्रचलित झाली आहेत. अपग्रेड असूनही, ते ना युद्धासाठी योग्य आहेत ना उड्डाणासाठी. गेल्या 5 वर्षात 483 हून अधिक मिग -21 विमाने अपघातांना बळी पडली आहेत. या अपघातात 170 हून अधिक वैमानिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा