Breaking


अकोले : कोतुळ येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात संपन्न !


कोतूळ
 / यशराज कचरे : दरवर्षी प्रमाणे जागतिक आदिवासी दिन हा कोतुळ मध्ये मोठ्या थाटामाटात उत्साहात साजरा करण्यात आला. गेल्या दोन वर्षापासून देशात कोरोनाचे सावट असताना मागील वर्षी नियमात कार्यक्रम साजरा झाला पण या वर्षी पोलीस प्रशासनाने व ग्रामपंचायत ने सहकार्य केले त्यानुसार पुढील कार्यक्रमाचे नियोजन हे शासकीय नियम पाळून कार्यक्रमाची दिशा ठरविण्यात आली.

ग्रामपंचायत मध्ये आद्यक्रांतिवीर राघोजी भांगरे, बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी विद्यमान सरपंच भास्कर लोहकरे, ग्रामविकास अधिकारी जाधव साहेब, ग्रामपंचायत सदस्य बबलू देशमुख, ग्रामपंचायत कर्मचारी जालिंदर वाकचौरे, महादू बांबळे, तसेच आद्यक्रांतिवीर राघोजी भांगरे प्रतिष्ठानचे यशराज कचरे, भाऊराव जाधव, सागर गोडे, प्रमोद गोडे, निखिल मुठे, सचिन धिंदळे, स्वप्नील धादवड आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


तसेच आद्यक्रांतिवीर राघोजी भांगरे प्रतिष्ठान, सर्व समाजबांधव कोतुळ व समस्त ग्रामस्थ गृपग्रामपंचायत( विहीर, शिंदे, पिंपरी) व आदिवासी विचारमंच, बिरसा बिग्रेड, कुंजेश्वर महादेव सेवा ट्रस्ट आणि राघोजी बिग्रेड यांच्या संयुक्त विद्यमाने या वर्षीचा जागतिक आदिवासी दिन साजरा झाला. 


आद्यक्रांतिवीर राघोजी भांगरे प्रतिष्ठान ने कोतूळकरणानं उडदावणे येथील कांबड नृत्य या प्रसिद्ध कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं. कार्यक्रमाला तालुक्याचे आमदार डॉ. किरण लहामटे, जेष्ठ नेते अशोक भांगरे, सभापती मारुती मेंगाळ , विद्यमान सरपंच भास्कर लोहकरे, उपसरपंच संजय देशमुख यांची प्रमुख उपस्थितीत क्रांतीकारकांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.


तसेच गावातून मोठ्या समाजबांधवांच्या उपस्थित मिरवणूक पार पाडली. यात प्रामुख्यानं कांबड नृत्य लक्षवेधी ठरलं, तसेच विहीर, शिंदे, पिपंरी येथील तरुणांची आलेली  शिस्तबद्ध रॅली यां सगळ्यामुळं कोतुळ शहर गजबजून गेलं. कार्यक्रम यशश्वी पार पाडण्यासाठी आद्यक्रांतिवीर राघोजी भांगरे प्रतिष्ठानचे भाऊ जाधव, निखिल मुठे, दिपक नाडेकर, स्वप्नील धादवड, संदीप पारधी, राहुल साबळे, सचिन धिंदळे, महेश लेंभे, कविराज पारधी, सचिन लांघी, सोमा जाधव, दिपक कचरे, भरत लांघी, किशोर गंभिरे, व विहीर, पिंपरी, शिंदे आदी सर्व नोकरदार वर्ग यांच्या सहकार्याने कार्यक्रम व्यवस्थित पार पडला.


हॉल मध्ये आलेल्या प्रमुख पाहुण्यांनी जमलेल्या आदिवासी समाजबांधवांना जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच अनेकांनी मनोगत व्यक्त केल्यानंतर शेवटी आभार यशराज कचरे यांनी मांडले. कोतूळकरासाठी येणाऱ्या काळात कोतुळ मध्ये एक भव्य असं आदिवासी सांस्कृतिक भवन असावं अशी इच्छा व्यक्त केली, येणाऱ्या पुढील काळात नक्कीच कोतुळ मध्ये भव्य असं आदिवासी भवन असेल अशी ग्वाही दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा