Breakingआकुर्डी : स्वातंत्र्याचे अमृत वंचितांना मिळाल्याशिवाय हुतात्म्यांना मोक्ष नाही - प्रा.डॉ.वंदना पिंपळे


पिंपरी चिंचवड : स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी ध्वजारोहण  आकुर्डी येथे बाबुराव घोलप महाविद्यालय, सांगवी येथील वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.डॉ.वंदना पिंपळे यांच्या हस्ते करण्यात आले.


डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया (डी. वाय.एफ.आय.) आणि जनवादी महिला संघटनेच्या पिंपरी चिंचवड समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात वंदना पिंपळे म्हणाल्या की, 1857 पासून  स्वातंत्र्याची लढाई लढून लाखो हुतात्म्यांनी रक्त सांडले. आमचा देश स्वतंत्र झाला. संविधानाने मूलभूत अधिकार दिले. कल्याणकारी सरकारानी देशाला प्रगती पथावर नेले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवात सामान्य माणूस समृद्ध झाला आहे का याचा लेखाजोखा घ्यावा लागेल.

कोरोना महामारीच्या काळात रोजंदारी, मोलमजुरी, कंत्राटी कामगार आर्थिक विपन्नावस्थेत गेले. भूकमारी,महागाईने त्रस्त उपेक्षित वंचितांचे भीषण हाल पाहायला मिळाले. कोट्यवधी वंचितांच्या जीवनात किमान समृद्धी मिळत नाही, तो पर्यंत हुतात्म्यांना मोक्ष मिळणार नाही, असेही पिंपळे म्हणाल्या.

यावेळी अमिन शेख, विनोद चव्हाण, विशाल पेटारे, सुभाष कालकुंद्रीकर, सतीश नायर, दिलीप पेटकर, वीरभद्र स्वामी, ख्वाजा जमखाने, सुषमा इंगोले, शैलजा कडुलकर, नूरजहाँन जमखाने, शिवराज अवलोळ, स्वप्निल जेवळे, आकाश साखरे, क्षितिज दोडमनी आदीसह उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा