Breaking
'आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात वाढ' हे एकजूटीच्या लढ्याचे यश - राजू देसले


नाशिक 'आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात वाढ' हे एकजूटीच्या लढ्याचे यश आहे, असे मत महाराष्ट्र राज्य आशा व गट प्रवर्तक संघटना (आयटक) चे राज्य अध्यक्ष राजू देसले यांनी व्यक्त केले.

 
आशा स्वयंसेविकांना राज्य शासनाकडून देण्यात येणाऱ्या दरमहा मोबदल्यात एक हजार रुपये तर गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात दरमहा बाराशे रुपयांची वाढ करण्यास राज्य मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.


कोरोना महामारी सुरु असेपर्यंत आशा स्वयंसेविका व आशा गटप्रर्वतक यांना  दरमहा पाचशे रुपये कोविड भत्ता राज्य शासनाच्या निधीतून अदा करण्यास मान्यता देण्यात आली. प्रस्तावित वाढ जुलै 2021 या महिन्यापासून देण्यात येईल. यासाठी होणाऱ्या अंदाजे 135 कोटी 60 लाख रुपयांच्या वार्षिक तरतुदीस मान्यता देण्यात आली.

या निर्णयाचा स्वागत करत महाराष्ट्र राज्य आशा व गट प्रवर्तक संघटना (आयटक)
 आशा व गट प्रवर्तक कृती समिती महाराष्ट्र वतीने सरकारचे आभार व्यक्त केले. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा