Breaking


९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनी शासकीय सुट्टी जाहीर करा अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेची मागणी


नाशिक (सुशिल कुवर) : ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन हा आदिवासींच्या कलेचा, सन्मानाचा, अस्तित्वाचा आणि आदिवासी संस्कृती टिकविण्याचा हा दिन संपूर्ण विश्वामध्ये संयुक्त राष्ट्र संघाने (uno) ने जाहीर केल्यामुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव हा दिवस आपल्या संस्कृतीत साजरा करतात. त्यामुळे दि. ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनानिमित्त या दिवशी शासकीय सुट्टी जाहीर करावी अशी मागणी अखिल भारतीय विकास परिषदेने नाशिक जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.


यावेळी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश युवा अध्यक्ष लकी जाधव यांच्या नेतृत्वाखाली व प्रमुख उपस्थितीत निवेदन देऊन सकारात्मक चर्चा करण्यात आली, त्याप्रसंगी के. ए. ग्रुपचे अध्यक्ष संदीप गवारी, छत्रपती संभाजीराजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश जुंदरे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा