Breaking
भाजपा व्यापारी आघाडीची पुणे जिल्हा कार्यकारिणी जाहीर !


जुन्नर तालुक्यातील संतोष बोडके, शिवाजी डुंबरे यांना महत्त्वपूर्ण जबाबदारीपुणे : आज (दि.२८) भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा व्यापारी आघाडीचा पदग्रहण समारंभ दौंड येथे आयोजित करण्यात आला. दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष स्वप्निल पोपटलाल शहा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.


यावेळी जुन्नर तालुक्यातील खामुंडी गावचे प्रसिद्ध व्यवसायिक संतोष मुरलीधर बोडके यांची पुणे जिल्हा व्यापारी आघाडीच्या संघटकपदी तसेच ओतुर गावचे शिवाजी शंकर डुंबरे यांची कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली.


आगामी काळात भाजपाच्या नेत्या जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके नेतृत्वात तसेच तालुकाध्यक्ष संतोषशेठ तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली व्यापारी आघाडीचे काम जुन्नर तालुक्यात जोमाने वाढवणार असे बोडके यांनी सांगितले.

याप्रसंगी जिल्हा संघटन सरचिटणीस धर्मेंद्र खांडरे, सुदर्शन चौधरी, जुन्नर तालुका सरचिटणीस मयुर तुळे आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा