Breaking
भंडारदरा परिसरात पर्यटकांकडून होणाऱ्या अत्याचाराविरोधात बीटीपी ने उठवला आवाज


राजूर (अकोले) : भंडारदरा परिसरात पर्यटकांकडून होणाऱ्या अत्याचार आणि छेडछाड विरोधात बीटीपी च्या वतीने राजूर पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरक्षक यांच्या मार्फत जिल्हा पोलीस अधिक्षक  अहमदनगर यांना देण्यात आले.


निवेदनात म्हटले आहे की, अहमदनगर जिल्हातील चेरापुंजी समजल्या जाणऱ्या भंडारदरा धरण परिसर व पर्यटन कळसूबाई हरिचंद्रगड परिसरात दर वर्षी हजारो पर्यटक येतात. मुंबई, पुणे, नाशिक शहरातील पर्यटक हे शांत व संयमी असतात सह परिवार या भंडारदरा धरण परिसरात वर्षासहलीचा आंनद घेत असतात. 


मात्र या ठिकाणी सध्या अहमदनगर जिल्हातील काही स्थानिक तरूण युवकांची टोळी दहशत माजवत असून स्थानिक आदिवासी महिला व मुली यांची छेडछाड व विनयभंग करण्याचे प्रकार घडत आहेत, तसेच स्थानिक आदिवासी तरूणांवर देखील जीवघेणा प्राणघातक धारदार शस्त्राने दिवसा ढवळ्या वार करण्यात येत आहे.

या वाढणाऱ्या गुन्हेगारी च्या निषेधार्थ भारतीय ट्रायबल पार्टी अकोले तालुका च्या वतीने अहमदनगर जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या कडे सुरक्षिततेची मागणी करण्यात आली आहे. जर पुन्हा या परिसरात कुठलाही अनुचित प्रकार घडल्यास याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील, व भंडारदरा धरण परिसरात शनिवारी व रविवारी वाढीव पोलीस बंदोबस्त व वनविभागाने अभयारण्य क्षेत्रात गस्ती पथक नेमण्यात यावेत तसेच पोलीस प्रशासन यांच्या वतीने पर्यटकांची नोंद व वाहनांची तपासणी करण्यात यावी, अहमदनगर जिल्हा हद्द बारी घाटमाथा या ठिकाणी पोलीस चेक पोस्ट उभारण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

या वेळी भारतीय ट्रायबल पार्टी अहमदनगर जिल्हा प्रभारी डॉली डगळे, राजूर महिला शहराध्यक्षा शशिकला भांगरे, तसेच अकोले तालुका महिला संघटक माधुरी डगळे व तालुक्यातील युवा बीटीपी कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा