Breakingबारामती : तांदुळवाडीत 75 वा स्वतंत्र दिन उत्साहात साजरा !


बारामती / रत्नदिप सरोदे : आज दिनांक १५ ऑगस्ट रोजी ७५ वा स्वातंत्र्य दिनी, कृषी महाविद्यालय भानसहिवरे, (ता.नेवासा) येथील कृषिकन्या श्रुती किरण मोहिते यांनी जिल्हा परिषद शाळा तांदुळवाडी येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम यशस्वीरित्या सहभाग नोंदवला.


वाचा सविस्तर : केळी खाताना कोणती काळजी घ्यावी ?


सदर कार्यक्रमाचे औचित्य साधून कृषिकन्या  मोहिते श्रुती किरण हिने तेथील शिक्षक वृंद व उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधत शेतीपूरक व्यवसाय, पाण्याचे महत्त्व, पाणीवापर नियोजन काळाची गरज, वृक्ष लागवड व संवर्धन आदी बाबी विषयी चर्चा केली व शाळेतील मुलांना व ग्रामस्थांना कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क व सॅनिटायझरचा वापर करण्याचा व आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्याचा व इतर बाबींची काळजी घेण्यास सांगितले.


कार्यक्रमाच्या वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. दरेकर, उपमुख्याध्यापक हिरवे सर, व इतर शिक्षक व ग्रामस्थ दिपक तारकुंडे हे आदीसह उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा