Breaking


मोठी बातमी : पुण्यात आढळला झिका व्हायरसचा पहिला रुग्ण, राज्याची डोकेदुखी वाढली


पुणे : गेल्या दीड वर्षापासून कोरोनाच्या महामारीने जगभरात थैमान घातलं आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये देशातील आरोग्य व्यवस्था कोलमडून पडली होती, यातून सावरत असतानाच राज्यात "झिका"चा पहिला रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. 


पुणे जिल्ह्यामधील पुरंदर तालुक्यातील बेलसर येथे झिका व्हायरसचा हा रुग्ण आढळला असून महाराष्ट्रातील हा पहिला रुग्ण आहे. पुरंदर येथील एका ५० वर्षीय महिलेला झिका व्हायरसची लागण झाली आहे. तसेच, या महिलेची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. या संबंधीचे वृत्त ANI ने वृत्त संस्थेने दिले आहे.


बेलसर गावातील एका पन्नास वर्षाच्या महिलेस झिकाची बाधा झाल्याचा निष्कर्ष ३० जुलै २०२१ रोजी प्रयोगशाळेने दिला होता, सदर महिला ही पूर्णपणे बरी झाली असून कुटुंबियांमध्येही कोणाला काही लक्षणे नसल्याचे सांगितले जात आहे.

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा