Breaking


विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी : शाळेची घंटा वाजणार, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती


मुंबई / रफिक शेख : राज्यातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आली आहे. येत्या 17 ऑगस्टपासून राज्यातील शाळा सुरू होणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आदेश आल्यावर याची अंमलबजावणी होईल. राज्यातील सर्व शाळा लवकरच सुरू करण्याचा शिक्षण विभागाचा विचार आहे. निर्णय घेण्यासाठी शिक्षण विभागाची पुढील आठवड्यात बैठक आहे. त्यात यावर चर्चा होणार असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.


सध्या 8 वी ते 12 वी पर्यंतचे वर्ग सुरू आहेत. उर्वरित वर्ग लवकरच सुरू होणार आहेत. 1 ऑगस्टला ब्रेक द चेन अंतर्गत जारी झालेल्या नियमावलीत शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार राज्य सरकारला आले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा