Breaking


ब्रेकिंग : अश्लील चित्रपट प्रकरण ; राज कुंद्रा यांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली


मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अश्लील चित्रपट बनवल्याप्रकरणी अटक केली होती. या प्रकरणी राज कुंद्रा न्यायालयीन कोठडीत असून जिल्हा सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात राज कुंद्राने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यांनी मुंबई पोलिसांनी केलेली अटक बेकायदेशीर असल्याचे आव्हान दिले होते. ही याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. 


अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणात राज कुंद्रा आणि रयान थोरपे यांना पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने दोघांना पोलीस कोठडी सुनावली. त्यानंतर दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.न्यायमूर्ती ए.एस. गडकरी यांच्या खंडपिठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली, त्यावेळी उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळताना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्‍यांनी कायदाच्या कसोटीवर आधारीत पोलीस कोठडी दिली आहे. त्यात हस्तक्षेप करण्याची जरुरी नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे राज यांना उच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा