Breaking
ब्रेकिंग : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जामीन मंजूर


महाड ता. २४ : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानावरून आज दिवसभर राज्यातील विविध शहरामध्ये त्याचे पडसाद उमटले. या प्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात महाराष्ट्र राज्यातील विविध ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. 

दिवसभरातील नाट्यमय घडामोडींनंतर रत्नागिरी पोलिसांनी त्यांना अटक केली होती, त्यानंतर त्यांना महाडच्या न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी पक्ष व नारायण राणे यांच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने राणे यांना पहिल्यांदा न्यायालयीन कोठडी सुनावली. मात्र नंतर लगेच त्यांचा जामीन अर्ज मंजूर करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा