Breaking
ब्रेकिंग : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक होणार?


पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यासाठी पुणे पोलिसांचे एक पथक चिपळूणला रवाना झाल्याची माहिती समोर येत आहे.


दोन दिवसांपूर्वी नारायण राणे यांनी जनआर्शीवाद यात्रेदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या नंतर नारायण राणे यांच्या विरोधात पुणे, नाशिक या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांचे एक पथक चिपळूणला रवाना झाले आहे. या पथकात दोन वरिष्ठ पोलिस निरीक्षकांचा समावेश आहे.


हे पण वाचा ! सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, पतीसह सात जणांवर गुन्हा दाखल


दरम्यान, शिवसेनेचे पुणे युवा सरचिटणीस रोहित रमेश कदम (रा. पाषाण) यांच्या तक्रारीवरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात चतुश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे राणे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.


- रफिक शेख 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा