Breaking


दापोलीत जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा


- सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

- कुडावळे आदिवासीवाडी व मौजे दापोली अशा २ ठिकाणी कार्यक्रम


रत्नागिरी : 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन दापोलीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कुडावळे आदिवासी वाडी येथे आदिवासी दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरूवात आदिवासी क्रांतीकारक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांचे कुडावळे आदिवासी वाडी तील ग्रामस्थांनी पुष्प देऊन स्वागत केले. सुशीलकुमार पावरा संस्थापक बिरसा फायटर्स यांनी जागतिक आदिवासी दिनाचे महत्व पटवून दिले. एस.बी.खरात कृषी अधिकारी दापोली यांनी आपले मनोगत व्यक्त केले व आदिवासी बांधवांना आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या.


चंद्रभागा पवार ग्रामपंचायत सदस्या तथा राज्य महिला प्रतिनिधी बिरसा फायटर्स, मालती पवार, शिवाजी पवार आदिवासी वाडी प्रमुख, विठोबा जगताप दापोली तालुका अध्यक्ष, महेश वाघमारे तालुका सचिव, विजय पवार, तटकरे, सापटे, कुडावळे सरपंच कदम, शाळेतील शिक्षक सामाले, मोतेवार तसेच वेरळ आश्रमशाळेतील मुख्याध्यापक खामकर, शिक्षक लोहार व गावातील अनेक मान्यवर मंडळी, विद्यार्थी पालक उपस्थित होते. शाळेतील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुशीलकुमार पावरा यांनी केले. आभार प्रदर्शन शिक्षक सामाले यांनी केले.


त्यानंतर मैदानावर गोफण स्पर्धा घेण्यात आली. गोफण स्पर्धेत एकूण १६ स्पर्धकांनी भाग घेतला. विजेता स्पर्धकांना रोख बक्षीस देण्यात आली. नंतर कुडावळे आदिवासी वाडी तील महिलांनी आदिवासी पारंपरिक नृत्य सादर केले. त्यानंतर आदिवासी मुलींनी आदिवासी नृत्ये सादर केली. त्या नृत्यांना प्रेषकांनी बक्षिसे दिली. कार्यक्रमाला अनेक प्रेषकांची उपस्थिती होती. कार्यक्रम सकाळी १० वाजेपासून ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत घेण्यात आला. या दिवशी आदिवासी बांधवांत एक वेगळाच उत्साह होता.मराठी शाळेजवळ मौजे दापोली येथे सुद्धा आदिवासी अधिकारी व कर्मचारी यांच्या मार्फत जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला. बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाला केंद्रप्रमुख गुलाबराव गावीत, मुख्याध्यापक राजेंद्र पाडवी, आरोग्य सेवक वारे, दत्तात्रय वाघमारे, पिंगला पावरा, संगिता पवार, अरूण वळवी, आरोग्य सेवक वारे, पोलीस खात्यातील कर्मचारी, सुशीलकुमार पावरा संस्थापक बिरसा फायटर्स व काही विद्यार्थी उपस्थित होते.


एक तीर एक कमान, सारे आदिवासी एक समान !जागतिक आदिवासी दिनाचा विजय असो ! भगवान बिरसा मुंडा की जय ! नाग्या कातकरी की जय ! जय बिरसा, जय आदिवासी ! अशा कार्यक्रमात घोषणा देण्यात आल्या. सुशीलकुमार पावरा संस्थापक  बिरसा फायटर्स यांनी मार्गदर्शन केले व सर्व आदिवासी बांधवांना जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा