Breaking


दिघी मध्ये जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा !


दिघी : दिघी मध्ये आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. कार्यक्रमासाठी राष्ट्रीय आदिम महोत्सव दिल्ली येथे गौरविलेल्या दिघीतील पहिल्या आदिवासी महिला उद्योजिका सिताबाई गणपत किर्वे यांचे महिला स्वयंरोजगार मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला.


कार्यक्रमात आदिवासी हे जंगल रक्षक व निसर्ग पुजक असल्या कारणाने सर्व मान्यवरांना झाडे वाटप करण्यात आली.

 


या कार्यक्रमाचे सर्व नियोजन सामाजिक कार्यकर्ते रमेश चंद्रकांत विरणक व भिमाशंकर नगर मित्रमंडळाने केले होते. या कार्यक्रमस पिंपरी चिंचवड शहराच्या उपमहापौर हिरा घुले, नगरसेवक विकासभाऊ डोळस, नगरसेविका निर्मला गायकवाड, माजी नगरसेविका आशा सुपे, युवा नेते शशी टिंगरे आदी मान्यवर उपस्थित होते. 


भिमाशंकर नगर मित्रमंडळातील विशाल झांजरे, शुभम गवारी, दर्शन गवारी, मारूती दुधे, सुधीर शेळके, आमोल किर्वे, प्रविण शेळके या तरूणांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा