Breaking


आरळा येथे मोठ्या उत्साहाने जागतिक आदिवासी दिन साजराशिराळा : बिरसा फायटर्सच्या वतीने आरळा येथे कोरोनाचे नियम पाळून जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष हरिभाऊ घोडे यांनी आदिवासींचे प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी एकसंघ होणे आवश्यक आहे. आपली संस्कृती, परंपरा जपणे गरजेचे आहे. एकमेकांना सहकार्य केले पाहिजे असे आवाहन केले. प्रमुख वक्ते म्हणून भाष्य करतांना नामदेव डाखोरे यांनी आदिवासी समाजाच्या पिढी समोरील आव्हाने, विविध समस्या व आपली भूमिका यावर मत व्यक्त केले. तसेच, बोगस घुसखोरी विषयी चिंता करतांना संघटनात्मक कार्याला बळकटी देण्याचे आवाहन केले. राजेंद्र पाडवी यांनी आदिवासी दिनाची सुरुवात, महत्त्व व आदिवासींचे हक्क अधिकार याविषयी आपल्या प्रास्ताविकेत मांडले. महादू कोंढार, गोरखनाथ ठाकरे यांनी मनोगत व्यक्त केले. 


यावेळी विलास कऱ्हाळे, मुकेश गावीत, विलास चौधरी, माधव पवार, युवराज फासळे, भावीन साळुंखे, सुधीर साळुंखे समाजबांधव उपस्थित होते. महेंद्र गावीत यांनी सूत्रसंचालन तर भगवान महाले यांनी कार्यक्रमाचे आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा