Breaking


चांदवड : उपजिल्हा रुग्णालय चांदवड येथे मोफत जलनेती प्रशिक्षण अभियान संपन्न


चांदवड (सुनिल सोनवणे) : योगदर्शन फाउंडेशन, चांदवड संचलित योग विद्या धाम, चांदवड आयोजित आणि इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन दिल्ली, व पारस मिरॅकल, नगर यांच्या सहकार्याने नाशिक जिल्ह्यात प्रथमच चांदवड तालुक्यातील नागरिकांसाठी मोफत जलनेती प्रशिक्षण अभियान अंतर्गत महाराष्ट्र शासनाचे उपजिल्हा रुग्णालय, चांदवड येथे मोफत जलनेती प्रशिक्षण अभियान शिबीर मोठ्या उत्साहात संपन्न झाले.


कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुशीलकुमार शिंदे व योगदर्शन फाउंडेशनचे अध्यक्ष व योग विद्या धाम, चांदवडचे केंद्रप्रमुख व योग प्रशिक्षक राहुल (अंबादास) बी. येवला उपस्थित होते. प्रमुख अतिथींच्या हस्ते दवाखान्याचे सर्व डॉक्टर्स व आरोग्यसेवा कर्मचारी यांना मोफत जलनेती पात्रांचे वाटप करण्यात आले.


योग प्रशिक्षक राहुल येवला यांनी जलनेती ही नासिकामार्गाची शुद्धिक्रिया कोविड १९ या व इतर संसर्गजन्य आजारासाठी तसेच श्वसनाच्या विकारांवर कशी प्रभावी आहे याचे प्रात्यक्षिकासह महत्व विशद केले. त्यानंतर राहुल येवला यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णालयाच्या सर्व पदाधिकारी डॉक्टर्स व आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांनी कोविड १९ च्या सर्व नियमांचे पालन करत वेगवेगळ्या गटात जलनेतीचा प्रात्यक्षिक अभ्यास केला. शेवटी सर्व लाभार्थी डॉक्टर्स व आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांनी जलनेती हि शुद्धिक्रिया आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त व फायदेशीर असल्याचे मनोगत व्यक्त केले. प्रमुख अतिथी वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या भाषणात जलनेती श्वसन व संसर्गजन्य आजार दूर ठेवण्यासाठी आत्यावश्यक आहे, तरी चांदवड तालुक्यातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. तर राहुल येवला यांनी पुढे होण्याऱ्या योग, प्राणायाम व जलनेती शिबिरासाठी इच्छुक नागरिकांनी ९३७०३८२९४२/ ७३८५२१६९५१ वर संपर्क साधावा असे सांगितले.


शिबिराच्या आयोजनासाठी इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशनचे उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष स्वामी शिवानंद महाराज, कार्याध्यक्ष डॉ. रमाकांत जाधव व नाशिक जिल्ह्याच्या उपाध्यक्षा डॉ. तस्मिना शेख यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.


सदर कार्यक्रमासाठी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुशीलकुमार शिंदे, डॉ. सचिन पवार, डॉ. विष्णू पालवे, डॉ. दीपक राजपूत, डॉ. हेमंत दळवी, विनोद लोखंडे, काशिनाथ झोले, शरद चव्हाण, प्रकाश पारवे, पराग नेरकर, धवल गुजराथी, सागर वाघमारे, जे. आर. बैरागी, अर्चना बाबरे, पल्लवी जगताप, राजश्री राजगुरू, तृप्ती गोर्हे, पंडित शिंदे, छाया भारूड, शीतल गायकवाड, आरती ढाके, रेखा बागुल, सारला खुटे, रमेश रौंदळ, नितीन ठाकरे, मनीषा जोशी, उर्मिला जगताप, किरण गावित, आदी पदाधिकारी डॉक्टर्स व आरोग्यसेवा कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल योग विद्या गुरुकुल, नाशिकचे अध्यक्ष व कुलगुरू डॉ. विश्वास मंडलिक, अखिल भारतीय योग शिक्षक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मंगेश त्रिवेदी, राज्याचे अध्यक्ष डॉ.मनोज निलपवार आदींनी शुभेच्छा व्यक्त केल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा