Breaking
ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचा चांदवड नगरपरिषदेच्या वतीने केला निषेध


चांदवड, (सुनिल सोनवणे) ता. ३० : ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिपळे, माजिवाडा प्रभाग या अतिक्रमण विरोधी पथक घेऊन अनाधिकृत हातगाड्यांवर कारवाई करत असताना तेथील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या हातगाडी फेरीवाल्याने आयुक्त कल्पिता पिपळे आणि अंगरक्षक सोमनाथ पालवे यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने जीवघेणा हल्ला करून या दोघांनाही गंभीर दुखापत केली आहे. याचा चांदवड नगरपरिषदेच्या वतीने निषेध करण्यात आला व प्रांताधिकारी, तहसीलदार व पोलिस निरीक्षक चांदवड येथे निवेदन देण्यात आले.


सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंगळे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला असून त्यात त्यांच्या हाताची दोन बोटे तुटली तसेच त्यांचा अंगरक्षक सोमनाथ पालवे यांना देखील गंभीर दुखापत झाली आहे. झालेला प्रकार अतिशय गंभीर असून एका महिला अधिकाऱ्यावर अशा प्रकारचा हल्ला होणे हे नक्कीच अत्यंत चिंताजनक बाब आहे. त्यामुळे चांदवड नगरपरिषदेच्या वतीने गुन्हेगारी कृत्याचा जाहीर निषेध करत हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.


यावेळी चांदवड नगरपरिषदेचे स्वच्छता व पाणीपुरवठा अभियंता सत्यवान गायकवाड, बांधकाम अभियंता अनिल कुरे, कर व प्रशासकीय अधिकारी पवन कस्तुरे, संगणक अभियंता तुषार बागूल, लिपिक अमोल आहेर, महेंद्र कांदळकर, कैलास गांगुर्डे, मूफिज शेख, शैलेश पवार, राजू बेलदार आदी कर्मचारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा