Breaking
कोरोना सदृश लक्षणं असल्याने बैठकीला उपस्थित राहू शकलो नाही. मात्र मोबाईलवरुन चर्चा झाली - डॉ.अमोल कोल्हेनारायणगाव / रवींद्र कोल्हे : 'सेव्हन हिल्स' रुग्णालयात कोरोनाच्या उपचारासाठी दाखल असल्याने बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू करण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र बैठकीपूर्वी राज्याचे पशुसंवर्धनमंत्री सुनीलजी केदार यांच्यासोबत मोबाईलवर बैलगाडा शर्यत सुरु करण्यासंदर्भात भूमिका मांडत चर्चा केली. असल्याची माहिती खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी रुग्णालयातून दिली.


महाराष्ट्र जनभूमी च्या प्रतिनिधीशी बोलतांना खा.डॉ.कोल्हे म्हणाले की, पशुसंवर्धन मंत्रालयाच्या वतीने बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू करण्यासाठी आयोजित केलेली खुली बैठक आज मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात संपन्न झाली. त्याबाबत त्यांना विचारले असता, डॉ.कोल्हे बोलत होते.


हे पण वाचा ! बैलगाडी शर्यती आणि सराव पूर्ववत सुरु करण्यासाठी महिनाभरात मार्ग काढणार - पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार


या बैठकीला पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी उपस्थितांशी संवाद साधतांना एका महिन्यात बैलगाडा सरावाचा विषय सोडविला जाईल. तसेच न्यायालयात असलेल्या विषयात राज्यसरकार शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहून बाजू मांडणार असल्याचे सांगितले आहे. तर गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी बैलांची वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांना त्रास होऊ नये यासाठी येत्या दोन दिवसांत गृहविभागाच्या अधिकऱ्यांशी चर्चा करून निर्देश दिले जातील असे सांगितले.


बैलगाडा शर्यत सुरू व्हावी ही जनतेची व शेतकऱ्यांची इच्छा आहे. सरकार शेतकऱ्यांच्या इच्छेने सत्तेवर आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून त्यांच्या मागणीला समर्थन दिले आहे. पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार हे पारदर्शक मंत्री आहेत. त्यामुळे त्यांनी मंत्रालयात खुली बैठक बोलावली आहे. ते हा प्रश्न नक्की सोडवतील असा विश्वास जलसंवर्धन मंत्री जयंत पाटील यांनी या बैठकीत बोलतांना व्यक्त केला.


हे पण पहा ! जुन्नर : मोक्काच्या दोन गुन्ह्यात तीन वर्षांपासून फरार असलेलल्या कुविख्यात दरोडेखोराला स्थानिक गुन्हे शाखेने सिनेस्टाईलने पाठलाग करुन ठोकल्या बेड्या !


त्याचप्रमाणे विविध जिल्ह्यातील बैलगाडा मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भूमिका मांडली. या बैठकीला आमदार शशिकांत शिंदे, आमदार संग्राम थोपटे, आमदार निलेश लंके, आमदार अनिल बाबर, आमदार संजय जगताप, पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डी.डी.परकाळे, डॉ.प्रशांत भड, विधी व न्याय,गृह विभागाचे विविध अधिकारी, बैलगाडा मालक संघटनेचे पदाधिकारी आणि शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.


हे पण वाचा ! पुणे: कुकडी प्रकल्प पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी, भविष्यात गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता !


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा