Breaking
DYFI, कॉ. तुळशीदास किल्लेदार सामाजिक ट्रस्ट वतीने पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप


कोल्हापूर : डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया (DYFI) आणि कॉ. तुळशीदास किल्लेदार सामाजिक ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने खडकेवाडा, गलगले, चिखली कौलगे, बानगे, सोनगे या गावांतील पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य किट वाटप केले. या किटमध्ये एक आकर्षक बॅग, दोन लहान वह्या, दोन मोठ्या वह्या, दोन पेन, एक कंपास पेटी असा समावेश होता. 


यावेळी डीवायएफआय महाराष्ट्र राज्य सेक्रेटरी कॉ. प्रीती शेखर, अखिल भारतीय किसान सभेचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष कॉ. डॉ. उदय नारकर, खडकेवाडा ग्रामपंचायत सदस्य कॉ. बाबुराव मेटकर, कॉ. तुळशीदास किल्लेदार सामाजिक ट्रस्टचे अध्यक्ष कॉ. शिवाजी मेथे, DYFI चे प्रफुल्ल पाटील यांच्यासोबत DYFI राज्य व जिल्हा कमिटी सदस्य, कॉ. तुळशीदास किल्लेदार सामाजिक ट्रस्ट चे सदस्य उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा