Breaking
29 आगस्ट ट्रॅक्टर रॅली यशस्वी करण्याचा निर्णय, भारतीय कम्युनिस्ट पक्ष मनपा, जिल्हा परिषद लढवणार !


नाशिक : भारतीय कम्युनिस्ट पक्ष जिल्हा कॉन्सिल बैठक 21 ऑगस्ट 2021 रोजी आयटक कामगार केंद्र नाशिक येथे आयोजित करण्यात आली होती भाकपचे राज्य सहसचिव कॉम्रेड ऍड. सुभाष लांडे, राज्य सचिव मंडळ कॉम्रेड राजू देसले उपस्थित  होते. बैठकीच्या आद्यक्षस्थानी देविदास भोपळे होते.येणाऱ्या निवडणूक जिल्हा परिषद, महानगरपालिका बाबत निर्णय घेण्यात आले. पक्ष संघटना बाबत जन संघटना आढावा घेण्यात आला शेतकरी कायद्या विरोधात व प्रस्तावित वीज बिल कायद्या विरोधात नाशिक येथे 29 ऑगस्ट रोजी ट्रॅक्टर रॅली आयोजित करण्यात आली आहे. ती येशस्वी होण्यासाठी किसान सभा, भाकप जनजागृती जिल्हाभर करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

तसेच शेतकरी- कामगार विरोधी केंद्र सरकारचे धोरण कायदे प्रस्तावित वीज बिल विधेयक शेतकरी विरोधी आहे.  एलआयसी चे खाजगीकरण, बँक विलीनीकरण धोरण, पीकविमा बाबत शेतकरी फसवणूक, कसत असलेल्या वन जमिनी त्वरित नावावर करा, सर्व कामगार कर्मचाऱ्यांना किमान वेतन द्या,  वाढती महागाई विरोधात, पेट्रोल डिझेल दरवाढ विरोधात 15 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2021 पर्यंत जनजागृती मोहीम राबविण्यात  येणार आहे. 1 लाख सह्या जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

बैठकीचे प्रास्तविक जिल्हा सचिव कॉम्रेड भास्कर शिंदे यांनी केले. बैठकीच्या सुरुवात भाई गणपत देशमुख, कॉम्रेड सुभान भाई देशमुख, कॉम्रेड शिवनाथ जाधव, कवी सतीश काळसेकर, कॉम्रेड विजय गणाचार्य,  कॉम्रेड श्रीधर देशपांडे आदी कार्यकर्ते कोरोना काळातील मृत्यू झालेले तसेच दिल्ली शेतकरी आंदोलनातील शाहीदांना आदरांजली वाहण्यात आली.

या प्रसंगी विराज देवांग, दत्तात्रय गांगुर्डे,  नामदेव बोराडे, पद्माकर इंगळे, वित्तल घुले, किरण डावखर, एस खतीब, शिवाजी पगारे, जगन माळी, ज्ञाणेश्वर माळी, समीर शिंदे, कॉम्रेड सुनीता कुलकर्णी, कॉम्रेड मीना आढाव, अविनाश दोंदे, निवृत्ती कसबे, नितीन शिरलकर, प्रा. आर भोंग आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा