Breaking


९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनी शासकीय सुट्टी जाहीर करा - आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचाची मागणी


घोडेगाव,(दि.०६) : ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन हा आदिवासींच्या कलेचा, सन्मानाचा, अस्तित्वाचा आणि आदिवासी संस्कृती टिकविण्याचा हा दिन संपूर्ण विश्वामध्ये संयुक्त राष्ट्र संघाने (uno) ने जाहीर केल्यामुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव हा दिवस आपल्या संस्कृतीत साजरा करतात. त्यामुळे दि. ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनानिमित्त या दिवशी शासकीय सुट्टी जाहीर करावी अशी मागणी आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचाने नायब तहसीलदार असवले यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.


यावेळी आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचाचे प्रा.स्नेहल साबळे, एस.एफ.आय.विद्यार्थी संघटनेचे आंबेगाव तालुका सचिव समीर गारे,माजी अध्यक्ष महेश गाडेकर, आशा लोहकरे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा