Breaking


जयंत आसगावकर यांना आश्वासित प्रगती योजनेचे रद्द झालेले शासन आदेश पुनरुज्जीवित करण्याची मागणी


बार्शी : आयटक संलग्न विद्यापीठ व संलग्न महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघटनेकडून शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांना विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आश्वासित प्रगती योजनेचे रद्द झालेली शासन आदेश पुनर्जीवित करावे ही मागणी घेऊन निवेदन देण्यात आले.


आश्वासित प्रगती योजना रद्द झाल्याने सातवा वेतन आयोगाचा फायदा मिळत नाही, त्या वित्त विभागाने मान्यता द्यावी यासाठी वित्तमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आले. यावर आसगावकर यांनी शिक्षकेतरांच्या आश्वासित प्रगती योजना प्रश्न मांडून लवकरात लवकर निकालात काढू असे आश्वासन दिले.


निवेदन सादर करण्यासाठी संघटनेचे प्रवीण मस्तुद, उमेश मदने, सचिन झाडबुके, सुधीर सेेवकर, दत्तात्रय पवार, प्रज्ञा हेंद्रे, मोहन सुतार, भीमाशंकर बिराजदार, आनंद व्हटकर आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा