Breaking


विजेच्या तारांचा घर्षणामुळे भाजलेल्या 'त्या' ८ वर्षाच्या मुलीची देवराम लांडे यांनी घेतली भेट


जुन्नर : जुन्नर तालुक्यातील केळी गावात (ता. १०) रोजी विजेच्या तारांचा घर्षणामुळे अचानक आग लागल्यामुळे ८ वर्षाच्या चैताली अशोक लांडे हिच्या अंगावर आगीचे लोळ पडल्यामुळे भाजली होती. यामध्ये चैतालीचे ३० टक्के शरीर भाजलं गेलं.


चैतालीला तात्काळ जुन्नरच्या मोकाशी हॉस्पिटल येथे ॲडमिट करण्यात आले. पण एमईसीबी चा कोणताही अधिकारी तिकडे फिरकला ननाही, असे जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे म्हणाले.


देवराम लांडे म्हणाले, केळी गावचे झनकु बो-हाडे यांनी मला फोन केला. परंतु मी केवाडी येथे एका मयतीला गेलो असल्यामुळे मला लगेच जाणे शक्य झाले नाही. दुसऱ्या दिवशी मी जाऊन प्रत्यक्ष पहाणी केली.


विचारणा केली असता एमईसीबी अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे सांगितले. व एमईसीबीचे अधिकारी घुले यांना फोन करुन त्या मुलीच्या उपचारासाठी पैसे दया नाहीतर मला तिकडे यायला लावू नका, असा इशारा देताच लगेचच एमईसीबी चे कर्मचारी १० मिनीटांत दवाखान्यात आले व मुलीची विचारपूस करून बील भरण्यासाठी पैसे दिले व पुढील उपचारासाठी देखील खर्च देणार असल्याचा शब्द दिला. तसेच मी सुध्दा थोडी आर्थिक मदत केली असल्याचे देवराम लांडे यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा