Breaking
दिंडोरी : सावळघाटात गाडी बंद पडल्याने तब्बल 6 ते 7 तास ट्रॅफिक जाम


दिंडोरी / पोपट गवारी : दिंडोरी तालुक्यातील गोळशी फाटा ते सावळघाट दरम्यान सहा तास रास्ता बंद होता. पेठ आणि  दिंडोरी हद्दीतील   सावळघाटात काही गाड्या बंद पडल्याने ट्रॅफिक जाम झाले होते. पेठ तालुक्यातील करंजाळी ते दिंडोरी तालुक्यातील आंबेगण फाटा या दरम्यान पर्यंत ट्रॅफिक जाम झाले होते.


सकाळी सुमारे 7 वाजेपासून ते 1 वाजेपर्यंत ट्रॅफिक सुरुच होते. सावळघाटातुन गाड्या जात नाही, हे बघताच मागच्या गाड्यांनी जोगमोडी - ननाशी मार्गे धुम ठोकली. या मार्गाने गेलेल्या गाड्या सहज निघुन गेल्या, परंतु करंजाळी ते आंबेगण पर्यंत अडकलेल्या गाड्यांना हलता येईना. शैक्षणिक विद्यार्थी आणि ऑफिस मध्ये काम करणाऱ्या नागरिकांना नाशिककडून येणाऱ्यांना गोळशी, ननाशी, जोगमोडी मार्गे पेठ ला जावे लागले. तर पेठ मधून येणाऱ्यांना तिर्डे, जोगमोडी, ननाशी, गोळशी मार्गे नाशिक जावे लागले.


दुचाकीनी अधुन मधुन नजर फिरवत मोकळा रस्ता गाठला. परंतु मालवाहतुकीच्या वाहनांना ना पुढे ना मागे अशी स्थिती निर्माण झाली होती. तालुक्यातील ट्रॅफिक पोलिसांच्या मदतीने ट्रॅफिक मोकळे करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा