Breaking
डाॅ. गेल ऑम्वेट यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्काराने सन्मानित करावे, कोल्हापूर येथे आयोजित शोकसभेची मागणी


कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या लेखिका, विचारवंत, समाजशास्त्राच्या अभ्यासक आणि सामाजिक चळवळीत अत्यंत मोलाचे योगदान देणाऱ्या डॉ. गेल ऑम्वेट यांना महाराष्ट्र शासनाने 'महाराष्ट्र भूषण' या पुरस्काराने सन्मानित करावे. अशी मागणी कोल्हापूर येथे आयोजित शोक सभेत करण्यात आली. ही शोकसभा 26 ऑगस्ट रोजी निर्मिती विचारमंच येथील आदित्य सभागृहात आयोजित करण्यात आली होती. 


यावेळी बोलताना जेष्ठ विचारवंत प्रा. किसनराव कुराडे म्हणाले, पैगंबर आणि त्यांच्या पत्नीने, फुले दांपत्याने सुरु केलेला प्रबोधनाचा वारसा आजच्या पिढीत डॉ. गेल आणि भारत पाटणकर यांनी सुरू ठेवला आहे. डॉ. गेल शरीराने जरी आता आपल्यात नसल्या तरी त्यांचे विचार आयुष्यभर या चळवळीला उपयोगी पडतील.


यावेळी बोलताना निर्मिती विचारमंचचे अध्यक्ष अनिल म्हमाने म्हणाले, डॉ. गेल ऑम्वेट यांनी आपले आयुष्य जाती अंतासाठी आणि दबलेल्या पिचलेल्या उपेक्षित माणसासाठी व त्यांना न्याय मिळावा या भूमिकेसाठी खर्ची पाडले. 

यावेळी अब्राहम आवळे म्हणाले, डॉ. गेल ऑम्वेट या प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ होत्या. त्यांनी पर्यायी राजकारणाची  मांडणी केल्याचे दिसून येते. प्रा. करुणा मिणचेकर म्हणाल्या डॉ. गेलो ऑम्वेट यांनी भारतातील स्त्री मुक्ती चळवळीसाठी सशक्त सैद्धांतिक मांडणी केली आहे.


आरपीआयचे नेते विश्वासराव देशमुख यांनी डॉ. गेलो ऑम्वेट यांचे आंबेडकरी चळवळीतील योगदान महत्त्वाचे असल्याचे नमूद केले. यावेळी डॉ. गेल यांचा स्मृतिग्रंथ प्रकाशित करून त्यांच्या कार्याचे सत्यकथन अक्षरबद्ध करण्याचा ही निर्णय झाला. अमेरिकेची प्रेसिडेंट होण्याची क्षमता आणि सामर्थ्य असलेली गेल भारत आणि भारत पाटणकर यांना निवडते ही बाब दुर्लक्षित करून चालणार नाही. सत्तेकडे पाठ फिरवून सत्याची कास धरणारी डॉ. गेल अत्यंत वैचारिक मांडणी करणारी आंतरराष्ट्रीय अभ्यासक होती.  

यावेळी इचलकरंजीचे नगरसेवक अब्राहम आवळे, अनिल म्हमाने, प्रा. डाॅ. कपिल राजहंस, डाॅ. दयानंद ठाणेकर, प्रा. करुणा मिणचेकर, प्रा. शोभा चाळके, रवी सरदार, सुभाष गुरव, आनंदा कांबळे, मंदार पाटील, भाग्यश्री पाटील, विजय कोरे यांच्यासह विविध मान्यवरांनी यावेळी आपल्या आठवणी व्यक्त केल्या.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा