Breaking
प्रलंबीत विम्या प्रश्नासाठी किसान सभेचा एल्गार३० ऑगस्टला कृषी आयुक्त कार्यालयावर शेतकरी धडकणार ; नित्रुड येथील विस्तारीत बैठकीत निर्णय


माजलगाव (अशोक शेरकर) : सन २०२० च्या प्रलंबित पीक विम्या प्रश्नी किसान सभेच्या वतीने एल्गार पुकारला असून येणाऱ्या ३० ऑगस्ट २०२१ रोजी पुणे येथील कृषी आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय दि २० ऑगस्ट रोजी नित्रुड ता. माजलगाव येथील किसान सभेच्या विस्तारीत बैठकीत घेण्यात आला.


सध्या विम्या प्रश्नावर किसान सभेच्या वतीने आक्रमक आंदोलनाची तयारी सुरु असून यासाठी जिल्हातील प्रत्येक गावात जनजागृती व बैठकीचे सत्र सुरू आहे. तसेच या बाबत जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना भेटून निवेदन देण्यात आले आहे.


आंदोलनाची पुढील नियोजनासाठी नित्रुड येथे बैठक संपन्न झाली. बैठकीत पी.एस.घाडगे, ऍड. अजय बुरांडे, दत्तात्रय डाके, जिल्हाध्यक्ष मोहन लांब, सरचिटणीस मुरलीधर नागरगोजे, संदीपान तेलगड, काशिनाथ सिरसाठ, दादासाहेब सीरसाठ, लहू खरगे, सुदाम शिंदे, सय्यद रज्जाक, डॉ. अशोक थोरात, भगवान पवार, भगवान बडे, बालाजी कडभाने, पांडुरंग उबाळे, रुस्तुम माने, मदन वाघमारे उपस्थित होते. 


या बैठकीला व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून किसान सभेचे राज्य सचिव डॉ अजित नवले यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीचे आभार प्रदर्शन सुभाष डाके यांनी केले. बीड जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना पुणे येथील होणाऱ्या आंदोलनात सहभागी करण्याचा निर्णय घेण्यात आला या प्रसंगी बहुसंख्यने कार्यकर्ते व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा