Breaking


लॉ अभ्यासक्रम प्रवेशपूर्व परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ


मुंबई विधी अभ्यासक्रम प्रवेशपूर्व परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र राज्य समितीने ही मागणी केली होती.


विधी अभ्यासक्रम प्रवेशपूर्व परीक्षेसाठी अर्ज करण्याची तारीख २९ जुलै २०२१ होती. परंतु राज्यातील पुर परिस्थिती आणि कोरोना महामारीचे संकट यामुळे अर्ज करण्यास मुदतवाढ मिळावी अशी मागणी करण्यात येत होती.

त्यानुसार आता विधी अभ्यासक्रम प्रवेशपूर्व परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना ९ ऑगस्ट २०२१ पर्यंत अर्ज करता येतील.

कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांसह पश्चिम व कोकण विभागात पूरस्थिती निर्माण झाली होती . अजूनही त्यातून तेथील नागरिक सावरले नाहीत. इतर तांत्रिक अडचणी देखील समोर आलेल्या आहेत. म्हणून पश्चिम, कोकण आणि मराठवाडा विभागातील हजारो विद्यार्थी सीईटीपासून वंचित विद्यार्थी आता अर्ज करु शकतील. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा