Breaking


आदिवासी वनधन केंद्रांना ट्रायफेड आणि सीएसआयआर यांच्या संयुक्त विद्यामाने 'फलोरीकल्चर' प्रशिक्षण


मुंबई : ट्रायफेड आणि सी. एस. आय. आर. - राष्ट्रीय वनस्पती अनुसंधान संस्थान लखनऊ यांच्या संयुक्त विदयामाने सी एस आय आर फलोरीकल्चर संदर्भात वन धन केंद्रांना प्रशिक्षण देण्यात येते.


महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच शाखांनी वनधन विकास केंद्र क्लस्टर शहापूर, पालघर येथील आदिवासी बांधवांना सी. एस. आय. आर. फलोरीकल्चर मिशन, राष्ट्रीय वनस्पती अनुसंधान संस्थान लखनऊ व ट्रायफेड जनजाती कार्य मंत्रालय, भारत सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली दोन दिवसीय प्रशिक्षण दिनांक २९ जुलै २०२१ व दि. ३० जुलै २०२१ रोजी प्रशिक्षण देण्यात आले.


फुलांपासून विविध वस्तू कशा बनवायच्या तसेच त्यांच्या विकीसंदर्भात डॉ.विजय विष्णू वाघ सी. एस. आय. आर. फलोरीकल्चर मिशनचे महाराष्ट्र राज्य समन्वय आणि डॉ.के.जे.सिंह अशा जेष्ठ व वैज्ञानिकांनी फलोरीकल्चर मिशन व त्यांचे महत्व उपस्थितांना पटवून दिले. 

या प्रशिक्षणांमध्ये डॉ अतूल बत्रा यांनी "डिहायडेट्रेड फलोरल काफ्ट" चे प्रात्यक्षिक दिले तसेच उपस्थितांना शिकवलेले विविध प्रकारची फुले व पाने देवून सुंदर सुशोभित पत्र बनवून सहभागी उपस्थितांकडुन प्रात्यक्षिक करुन घेतले. तसेच यासाठी लागणारे संसाधने देखील उपलब्ध करुन देण्यात आले. त्यानंतर डॉ.सतिश कुमार यांनी झेंडुच्या लागवडीबददल मार्गदर्शन दिले व झेंडुच्या बीयांचे वाटप ही केले. 


दिनांक ३० जुलै २०२१ रोजी डॉ.के.जे.सिंह यांनी नर्सरी टेक्निक बददल माहिती दिली तसेच शेंद्रुण, शहापूर येथे शेतक - यांची क्षेत्रभेट करण्यात आली व तेथे त्यांना फलोरीकल्चर मिशन बददल माहिती देण्यात आली. तसेच उपस्थितांना ट्रायफेडचे सहा.व्यवस्थापक शिवाजी चलवादी यांनी प्रशिक्षणाचा आदिवासी बांधवांनी जास्तीत जास्त फायदा करुन घ्यावा असे संबोधित केले. हे प्रशिक्षण वनधन विकास केंद्र शहापूर मधील कार्यालयात यशस्वीरित्या पार पाडले. 

अध्यक्ष सुनील पवार यांनी शेवटी सर्वांचे आभार व्यक्त केले यांनी प्रशिक्षणाचा समारोप घेतला. यावेळी गणेश धराडे, अरुण पानसरे, वनधन केंद्रांचे पालघर, ठाणे जिल्हयातील अध्यक्ष, सचिव, महिला, सदस्य उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा